नवी दिल्ली : रेल्वेकडे साफसफाई, स्वच्छता, सल्ला, प्रशिक्षण आणि इतर अशा प्रकारच्या सेवांमध्ये कंत्राटदारांमार्फत काम करीत असलेल्यांची माहिती रेल्वे प्रथमच स्वत:कडे आहे. या कामगारांच्या कोणत्याही हक्कांचे उल्लंघन होऊ नये, याकडेही लक्ष ठेवले जाणार आहे.
कार्यकारी संचालकांच्या समितीने तयार केलेल्या जनरल कंडिशन्स आॅफ कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) फॉर सर्व्हिसेसला रेल्वे मंडळाने मान्यता दिली. जीसीसीअंतर्गत रेल्वेने पूल व इमारतींची उभारणी, रेल्वेमार्ग रुंदीकरण आदी कामांमध्ये कंत्राटदारांसाठी रेल्वेने सर्व्हिस डिलिव्हरीत काम करणा-या कामगारांच्या अटी आणि शर्तींपेक्षा स्वतंत्र अटी आणि शर्ती बनवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमच होत असलेल्या या प्रयत्नात सेवा देणा-या सगळ्या कामगारांची माहिती असेल.
>सर्व तपशील रेल्वे स्वत:कडे ठेवणार
तपशिलात पोलिसांकडून झालेले त्यांचे सत्यापन, वैद्यकीय विमा, भविष्य निर्वाह निधी नोंदणी, सरकारने दिलेले ओळख प्रमाणपत्र, उपस्थितीची माहिती, सुरक्षेचा तपशील, कामगार कायद्यांचे प्रशिक्षण व वेतनाचा तपशील असेल. ही व्यवस्था कामगारांसाठी ओळखपत्रही तयार करील.
कंत्राटी रेल्वे कामगारांच्या हक्कांचे होणार रक्षण
रेल्वेकडे साफसफाई, स्वच्छता, सल्ला, प्रशिक्षण आणि इतर अशा प्रकारच्या सेवांमध्ये कंत्राटदारांमार्फत काम करीत असलेल्यांची माहिती रेल्वे प्रथमच स्वत:कडे आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:42 PM2018-02-04T23:42:32+5:302018-02-04T23:43:24+5:30