अोला: शहरातील घनकचरा उचलण्याचा कंत्राट १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला असून, २ कोटी ९० लाखांचे देयक थकीत असल्याने कंत्राटदाराने मुदतवाढ घेण्यास नकार दिला आहे. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने कोट्यवधींचे देयक थकीत असतानाही मनपाकडून संबंधित कंत्राटदाराला विनवणी केली जात आहे. यावर संबंधित कंत्राटदार काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट अमरावती येथील क्षितिज बेरोजगार संस्थेला २००७ मध्ये देण्यात आला. हा कंत्राट १५ फेब्रुवारी २०१५ रोजी संपुष्टात येणार आहे. यादरम्यान संबंधित कंत्राटदाराचे महापालिका प्रशासनाने तब्बल २ कोटी ९० लाखांचे देयक मागील दोन वर्षांपासून थकविले. यामुळे खासगी सफाई कर्मचार्यांचे देयक, इंधनाचा खर्च करणे आवाक्याबाहेर होत असल्याने पुन्हा मुदतवाढ घेण्यास संबंधित कंत्राटदाराने प्रशासनाकडे स्पष्ट नकार कळवला. परंतु ऐनवेळेवर पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने शहरात कचर्याची समस्या निर्माण होईल, या विचारातून आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ३१ मार्चपर्यंत कंत्राटाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र देयक थकीत असल्याने काम कसे करायचे, असा प्रश्न कंत्राटदाराने उपस्थित केल्यावर प्रशासनाची कोंडी झाली आहे. प्रशासनाने थकीत देयकातील काही रक्कम अदा केल्यास ३१ मार्चपर्यंत काम करता येईल, असे सुचक संकेत कंत्राटदाराने दिले आहेत.कोट...घनकचर्याचा कंत्राट रविवारी संपुष्टात येईल. आमच्याकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने कंत्राटदाराला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. थकीत देयकामुळे कंत्राटदार काम करण्यास नकार देत असला तरी काही रक्कम येत्या दोन-तीन दिवसात अदा केली जाईल. ३१ मार्चपूर्वी निविदा प्रक्रिया राबवली जाईल.-सोमनाथ शेटे, आयुक्त
घनकचर्याचा कंत्राट संपुष्टात २ कोटी ९० लाख थकीत तरीही कंत्राटदाराला विनवणी
अकोला: शहरातील घनकचरा उचलण्याचा कंत्राट १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला असून, २ कोटी ९० लाखांचे देयक थकीत असल्याने कंत्राटदाराने मुदतवाढ घेण्यास नकार दिला आहे. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने कोट्यवधींचे देयक थकीत असतानाही मनपाकडून संबंधित कंत्राटदाराला विनवणी केली जात आहे. यावर संबंधित कंत्राटदार काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:34+5:302015-02-14T23:50:34+5:30