अोला: महापालिकेच्या विसंगत धोरणामुळे वैतागलेल्या खासगी सफाई कंत्राटदारांनी पडीत प्रभागांमध्ये स्वच्छतेची कामे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, कचरा उचलण्याचा कंत्राट घेतलेल्या क्षितिज सहकारी संस्थेनेसुद्धा २ कोटी २२ लाखांचे देयक अदा न केल्यास काम बंद करण्याचा इशारा प्रशासनाला शनिवारी दिला. यामुळे शहरात साफसफाई व अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. मनपाच्या ३६ प्रभागांपैकी २० पडीत प्रभागात खासगी सफाई कंत्राटदारांच्या माध्यमातून साफसफाईची कामे केली जातात. खासगी सफाई कंत्राटदारांचा कंत्राट ऑगस्ट २०१४ मध्ये संपुष्टात आला असून, मागील चार महिन्यांचे देयक प्रशासनाकडे थकीत आहे. त्यापूर्वी चक्क नऊ महिन्यांचे देयक थकीत होते. कंत्राटदारांमधील रोष लक्षात घेता, प्रशासनाने नऊ महिन्यांचे देयक अदा केले. त्यानंतरचे देयक थकीत ठेवले. शिवाय, कंत्राटदारांचा कंत्राट संपुष्टात आल्यानंतरदेखील काम सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या कंत्राटदारांनी पडीत प्रभागातील स्वच्छतेची कामे बंद करण्याचा निर्णय घेतला असून, तसे प्रशासनाला कळविण्यात आले. कंत्राटदारांसोबतच कचरा उचलण्याचा कंत्राट घेतलेल्या क्षितिज सहकारी संस्थेनेसुद्धा थकीत देयकाची रक्कम अदा न केल्यास काम बंद करण्याचे निवेदनात नमुद केले आहे. कंत्राटदार व संस्थेने दिलेल्या इशार्यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे अकोलावासीयांचे लक्ष लागले आहे. बॉक्स...नगरसेवकांना गुंतवले! प्रभागातील सफाई कर्मचार्यांची अदला-बदल करण्याचा निर्णय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. त्यानुसार कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या; परंतु प्रशासनाच्या निर्णयामुळे स्वच्छता विभागाची संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याचे चित्र आहे. आरोग्य अधिकार्यांचे अधिकार क्षेत्रीय अधिकार्यांना देत, प्रशासनाने जाणीवपूर्वक गोंधळात भर घातली. अनेक ठिकाणी नेमके कोणते कर्मचारी कार्यरत आहेत, याबद्दल संभ्रम निर्माण झाला असून, नगरसेवकांना गुंतवण्यात प्रशासन यशस्वी ठरल्याचे बोलल्या जात आहे. बॉक्स...पडीत प्रभाग केले रद्दप्रशासनाने पाच पडीत प्रभागातील खासगी कंत्राटदारांचा कंत्राट रद्द करीत त्याठिकाणी आस्थापनेवरील सफाई कर्मचार्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. संबंधित प्रभागात प्रत्येकी ३० सफाई कर्मचारी नियुक्त केल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात २० कर्मचार्यांची नेमणूक केल्याची माहिती आहे. यामुळे प्रभागात साफसफाईचा प्रश्न बिकट होण्याची चिन्हं आहेत.
प्रभागांची स्वच्छता करण्यास कंत्राटदारांचा नकार क्षितिज सहकारी संस्थाही सरसावली
अकोला: महापालिकेच्या विसंगत धोरणामुळे वैतागलेल्या खासगी सफाई कंत्राटदारांनी पडीत प्रभागांमध्ये स्वच्छतेची कामे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, कचरा उचलण्याचा कंत्राट घेतलेल्या क्षितिज सहकारी संस्थेनेसुद्धा २ कोटी २२ लाखांचे देयक अदा न केल्यास काम बंद करण्याचा इशारा प्रशासनाला शनिवारी दिला. यामुळे शहरात साफसफाई व अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
By admin | Published: November 1, 2014 11:14 PM2014-11-01T23:14:29+5:302014-11-01T23:14:29+5:30