Join us  

अदानी ग्रुपकडे जाणार मुंबई विमानतळाचा कंट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 5:58 AM

अदानी ग्रुप जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून मुंबई विमानतळाचे ५०.५० टक्के समभाग खरेदी करणार आहे. याशिवाय एअरपोर्ट कंपनी आॅफ साउथ आफ्रिका आणि बिडव्हेस्ट ग्रुप यांच्याकडूनही मुंबई विमानतळाचे समभाग खरेदी करणार आहे.

नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपने मुंबईविमानतळाचे एकूण ७४ टक्के समभाग खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबईविमानतळाचा कंट्रोल हा लवकरच अदानी ग्रुपकडे जाणार असून, त्यामुळे हा ग्रुप भारतातील सर्वात मोठा खासगी आॅपरेटर ठरणार आहे.अदानी ग्रुप जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून मुंबई विमानतळाचे ५०.५० टक्के समभाग खरेदी करणार आहे. याशिवाय एअरपोर्ट कंपनी आॅफ साउथ आफ्रिका आणि बिडव्हेस्ट ग्रुप यांच्याकडूनही मुंबई विमानतळाचे समभाग खरेदी करणार आहे. या दोन्ही कंपन्यांकडून किती समभाग खरेदी केले जाणार याची माहिती अद्याप उघड झालेली नाही.अदानी ग्रुपची अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज ही कंपनी जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्सकडून समभाग खरेदी करतानाच जीव्हीकेचे कर्जही आपल्याकडे घेणार आहे.यामुळे अदानी ग्रुपला मुंबई विमानतळाचे ५०.५० टक्के समभाग मिळणार असून, अन्य छोट्या कंपन्यांकडून समभाग खरेदी करून अदानी ग्रुप आपले समभाग ७४ टक्क्यांवर नेणार आहे.देशातील जवळपास सर्वच विमानतळांची देखभाल सरकारी मालकीच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे आहे. मात्र आता हे काम खासगी क्षेत्राकडे सोपविण्यात येत असून, त्यामध्ये अदानी ग्रुप सर्वात पुढे आहे.सहा विमानतळेही अदानी ग्रुपकडेमुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच अन्य सहा विमानतळांच्या कामांचे टेंडर अदानी ग्रुपला मिळाले आहे. लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, थिरुवनंतपूरम आणि मंगळुरू ही सहा विमानतळे अदानी ग्रुपच्या नियंत्रणात येणार आहेत. हा ग्रुप देशातील विमानतळांची देखभाल करणारा सर्वात मोठा खासगी ग्रुप ठरला आहे. यापूर्वी अदानी ग्रुपने सी पोर्टसाठीही बोली लावली असून, या प्रकल्पातही त्यांचा सहभाग निश्चित झालेला आहे.

टॅग्स :विमानतळमुंबई