Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘डाळींच्या किमती नियंत्रित ठेवा’

‘डाळींच्या किमती नियंत्रित ठेवा’

डाळींच्या किमती १०० रुपयांच्या आत नियंत्रित ठेवा, अशा सूचना केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी राज्य सरकारे आणि व्यापाऱ्यांना दिल्या

By admin | Published: September 19, 2016 05:07 AM2016-09-19T05:07:42+5:302016-09-19T06:27:27+5:30

डाळींच्या किमती १०० रुपयांच्या आत नियंत्रित ठेवा, अशा सूचना केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी राज्य सरकारे आणि व्यापाऱ्यांना दिल्या

'Control the prices of pulses' | ‘डाळींच्या किमती नियंत्रित ठेवा’

‘डाळींच्या किमती नियंत्रित ठेवा’


मुंबई : सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती १०० रुपयांच्या आत नियंत्रित ठेवा, अशा सूचना केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी राज्य सरकारे आणि व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूर व उडीदडाळींच्या किमती देशाच्या अनेक भागांत १०५ ते ११० रुपये प्रति किलो आहेत; तर मूगडाळीच्या किमती १०० रुपयांच्या आत आहेत. गत वर्षात काही शहरांत तूरडाळींचे दर २०० रुपये किलोपर्यंत पोहचले होते. कमी मान्सून व डाळींच्या पुरवठ्याअभावी ही दरवाढ झाली होती. गत आठवड्यात राज्यांच्या सचिवांची बैठक पासवान यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी या सूचना दिल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'Control the prices of pulses'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.