मुंबई : सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती १०० रुपयांच्या आत नियंत्रित ठेवा, अशा सूचना केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी राज्य सरकारे आणि व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूर व उडीदडाळींच्या किमती देशाच्या अनेक भागांत १०५ ते ११० रुपये प्रति किलो आहेत; तर मूगडाळीच्या किमती १०० रुपयांच्या आत आहेत. गत वर्षात काही शहरांत तूरडाळींचे दर २०० रुपये किलोपर्यंत पोहचले होते. कमी मान्सून व डाळींच्या पुरवठ्याअभावी ही दरवाढ झाली होती. गत आठवड्यात राज्यांच्या सचिवांची बैठक पासवान यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी या सूचना दिल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘डाळींच्या किमती नियंत्रित ठेवा’
By admin | Published: September 19, 2016 5:07 AM