नवी दिल्ली : औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणाऱ्या राष्ट्रीय औषधी प्राधिकरणाने (एनपीपीए) कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब, बॅक्टेरिया संक्रमण यासारख्या आजारांवरील ५४ औषधांच्या किमतींची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. याव्यतिरिक्त आणखी ११ औषधांचे किरकोळ मूल्यही सरकारने निश्चित केले आहे. ‘एनपीपीए’च्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. निवेदनात म्हटले आहे, की एनपीपीएने औषध मूल्य नियंत्रण संशोधन आदेश २0१६ च्या अनुसूची अन्वये ५४ औषधांच्या किमती निश्चित तसेच संशोधित करण्यात आल्या आहेत. याशिवाय डीपीसीओ २0१३ अन्वये ११ औषधांच्या किरकोळ किमतीही निश्चित केल्या आहेत. गेल्या महिन्यात सरकारने काही औषधांच्या किमती निश्चित केल्या होत्या.
५४ औषधांच्या किमती नियंत्रित
By admin | Published: May 12, 2016 4:18 AM