Join us

वर्षभरात महागाई नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 2:13 AM

दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर राहणार ३.५ ते ३.७ टक्के

मुंबई : आगामी १२ महिन्यांच्या काळात म्हणजेच वर्षभरात किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या कक्षेतच राहील, तसेच चालू वित्त वर्षाच्या दुसºया सहामाहीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ३.५ टक्के ते ३.७ टक्के राहील, असे रिझर्व्ह बँकेने बुधवारी म्हटले आहे.पतधोरण आढावा सादर करताना रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, २०१९-२० या वित्त वर्षाच्या दुसºया सहामाहीसाठी महागाईचा दर संतुलित जोखमेसह ३.५ टक्के ते ३.७ टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. तिमाही ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर दुसºया तिमाहीत ३.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे.रिझर्व्ह बँकेने म्हटले की, पतधोरण आढावा समितीच्या अंदाजानुसार, सध्याची महागाईची स्थिती आगामी १२ महिन्यांच्या काळासाठी निर्धारित उद्दिष्टाच्या कक्षेत राहण्याचे अनुमान आहे. वित्त वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या सहामाहीत किरकोळ महागाईचा दर ३.६ टक्के राहण्याचे अनुमानित करण्यात आले आहे.रिझर्व्ह बँकेने बुधवारी जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात रेपोदरात ०.३५ टक्क्यांची म्हणजेच ३५ आधार अंकांची कपात केली आहे. जूनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने चालू वित्त वर्षाच्या दुसºया तिमाहीतील किरकोळ महागाईचा दर ३.४ टक्के ते ३.७ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.

टॅग्स :महागाई