Join us

अधिवेशन-९ (शासकीय रुग्णालयांना अन्नपुरवठा)

By admin | Published: July 15, 2015 11:12 PM

शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठ्यासाठी धोरण

शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठ्यासाठी धोरण
मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठीचे नवे धोरण ठरविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच शासनाला अहवाल देईल, असे या विभागाचे मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
मुंबई, ठाणे आणि अकोला जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे रु ग्णालय तसेच राज्य विमा विभागाच्या रु ग्णालयात बाजारभावापेक्षा जास्त दराने अन्नधान्य खरेदी केल्याबाबतची लक्षवेधी सूचना सरदार तारासिंह, सुहास साबणे, मंदा म्हात्रे, शंभुराजे देसाई यांनी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, अन्नधान्य खरेदीसाठीचे धोरण ठरविण्यासाठी आयुक्त; राज्य कामगार विमा योजना, यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी; राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि उपसचिव; सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय हे या समितीचे अन्य सदस्य आहेत. या समितीच्या अहवालानंतर या संदर्भात पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे.
मुंबई,ठाणे आणि अकोला विभागाच्या अखत्यारीतील सर्व रु ग्णालयांना अन्नधान्य व इतर खाद्योपयोगी वस्तूंचा तसेच नित्यपयोगी किरकोळ वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम अनुक्र मे गीताई महिला बचत गट, औद्योगिक सहकारी संस्था, दीक्षा सामाजिक संस्था या संस्थांना जादा दराने कंत्राट देण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला होता.
प्रादेशिक मनोरु ग्णालयातील रु ग्णांसाठी आहाराचे प्रमाण भिन्न असल्यामुळे त्यांना बाह्य संस्थेमार्फत आहार सेवा पुरविण्याबाबत स्वतंत्रपणे निविदा प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे. सध्या ही प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रु ग्णांलयासाठी खरेदी करण्यात येणार्‍या अन्नधान्याबाबतचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर केला जाईल, असेही सावंत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)