Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flipkart वर सुरू झाला कुलिंग डे सेल; कुलर, फ्रिज, एसीवर मिळतेय ५० टक्क्यांपर्यंत सूट

Flipkart वर सुरू झाला कुलिंग डे सेल; कुलर, फ्रिज, एसीवर मिळतेय ५० टक्क्यांपर्यंत सूट

१८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान Flipkart Cooling Days मध्ये स्वस्तात सामान खरेदी करण्याची मिळणार संधी.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 02:59 PM2022-02-19T14:59:20+5:302022-02-19T14:59:55+5:30

१८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान Flipkart Cooling Days मध्ये स्वस्तात सामान खरेदी करण्याची मिळणार संधी.

Cooling Day Sale kicks off on Flipkart; Up to 50% discount on cooler, fridge, AC | Flipkart वर सुरू झाला कुलिंग डे सेल; कुलर, फ्रिज, एसीवर मिळतेय ५० टक्क्यांपर्यंत सूट

Flipkart वर सुरू झाला कुलिंग डे सेल; कुलर, फ्रिज, एसीवर मिळतेय ५० टक्क्यांपर्यंत सूट

Flipkart Cooling Days : आता हळहळू थंडी कमी होण्यास सुरूवात झालीये आणि मार्च महिन्यापासून आता गर्मीची चाहूलही लागेल. गर्मीच्या महिन्यांमध्ये अनेकांचा कल एसी, कुलरसारख्या वस्तू घेण्याकडे असतो. या कालावधीत या वस्तूंची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. दरम्यान, तुम्हाला हव्या असलेल्या कुलिंग डिव्हाईसेस (Cooling Device) विकत घेताना त्यावर मोठी बचत करण्याची संधी आता मिळत आहे. फ्लिपकार्टवर सध्या फ्लिपकार्ट कुलिंग डेज सेल  (Flipkart Cooling Days Sale) सुरू झाला आहे. हा सेल 18 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये एअर कूलर, पंखे, फ्रीज आणि एसींवर भरघोस सूट दिली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्रोडक्टवर किती डिस्काउंट मिळत आहे.

Whirlpool च्या 500 एल फ्रॉस्ट फ्री डबल डोर 3 स्टार कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटरची (Whirlpool 500 L Frost Free Double Door 3 Star Convertible Refrigerator) किंमत 70600 रुपये इतकी आहे. परंतु या सेलदरम्यान तुम्हाला तो 52,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. Flipkart Cooling Days सेल दरम्यान रेफ्रिजरेटर 24 टक्के सूटवर उपलब्ध आहे. तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1500 रुपये आणि फ्लिपकार्ट फर्निचरवर 500 रुपये अतिरिक्त सूटही देण्यात येत आहे.

स्प्लिट इन्व्हर्टर एसीवरही सूट
या ऑफरदरम्यान Whirlpool 1 5 Ton 5 Star Split Inverter AC 33,900 रुपयांना विकत घेण्याची संधी मिळणार आहे. या एसीची मूळ किंमत 64,700 रुपये आहे. याचाच अर्थ यावर तुम्हाला 47 टक्क्यांची सूट मिळणार आहे. याशिवाय पेलेटरचा ऑप्शनचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. तर दुसरीकडे 5 हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक किंमतीच्या ऑर्डरवर अटींनुसार 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

MOTOROLA 1 5 Ton 3 Star Split Dual Inverter Smart AC वरही मोठी सूट मिळत आहे. यावर 5 टक्के म्हणजेच 1650 रुपयांची सूट देण्यात येत आहे. यानंतर क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं पैसे भरल्यास त्यावरही सूट देण्यात येईल. याशिवाय अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांनाही सूट मिळणार आहे. बँक ऑफरसह एकूण 4,650 रुपयांची सूट मिळेल. याचाच अर्थ एसची किंमत 28,340 रुपये इतकी असेल.

कुलरवरही डिस्काऊंट
कुलिंग सेलमध्ये, बजाज 22 लीटर रूम/पर्सनल एअर कूलर 18,490 रुपयांऐवजी आता 13,590 रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. तुम्हाला अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांपर्यंत आणि 5000 किंवा त्याहून अधिकच्या ऑर्डरवर 10 टक्के सूट मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील घेऊ शकता.

Web Title: Cooling Day Sale kicks off on Flipkart; Up to 50% discount on cooler, fridge, AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.