नवी दिल्ली : नफ्यातील सहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट देण्याची शक्यता सरकारने शुक्रवारी फेटाळून लावली. लोकसभेत उत्तर देताना वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले की, सहकारी बँका व्यापारी बँकांसारखेच कामकाज करतात. त्यामुळे त्यांना प्राप्तिकरात सूट दिली जाऊ शकत नाही.वित्तमंत्री असेही म्हणाले की, प्राप्तिकराची आकारणी नफ्यावर केली जात असल्याने नफा मिळविणाºया सहकारी बँकांना या करातून सूट देण्याचे कोणतेही समर्थनीय कारण नाही.
सहकारी बँकांना प्राप्तिकरात सूट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 3:45 AM