Copper Price Today: कोरोनाच्या काळात प्रत्येक जण गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित जागा शोधतोय. लोकं शेअर बाजारातही सांभाळून पैसे लावताना दिसत आहे. तर काही जण सोन्या चांदीमध्ये (Investment in gold-silver) आपली गुंतवणूक करताना दिसत आहे. पण यापेक्षाही एक निराळा धातू आहे तो म्हणजे तांबे (Copper return in one year), गेल्या वर्षभरात तांब्याचे दर हे दुपटीनं (Copper price become double) वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे तांब्यातही गुंतवणूक उत्तम पर्याय ठरू शकतो.
सध्या भारतात एमसीएक्सवर तांब्याचा वायदा बाजारातील दर ८०० रूपये प्रति किलो इतका आहे. जवळपास वर्षभरापूर्वी म्हणजेच १० मे रोजी तांब्याचे दर जवळपास ४०० रूपये प्रति किलो इतकी होती. म्हणजे वर्षभरात तांब्यानं तब्बल १०० टक्के रिटर्न दिले. इतकंच नाही तर यावर्षी तांब्याच्या दरात २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्यांनी तांब्यामध्ये गुंतवणूक केली ते सर्व सध्या नफ्यात आहेत.
अजून वाढतील किंमती
ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमॅन सॅक्सनं दिलेल्या माहितीनुसार आताही तांब्याच्या किंमतीत वाढ कायम राहणार आहे. २०२५ पर्यंत तांब्याची किंमती १५ हजार डॉलर्स प्रति टनवर पोहोचू शकतात असंही त्यांनी नमूद केलं. तर दुसरीकडे २२५ पर्यंत तांब्याची किंमती २० हजार डॉलर्स प्रति टनपर्यंत पोहोचू शकतात असं मत बँक ऑफ अमेरिकानं व्यक्त केलं. गेल्या महिन्यात पहिल्यांदाच तांब्याच्या दरानं दशकातील उच्चांकी स्तर गाठला. तांब्याचे दर १० हजार डॉलर्स प्रति टनवर पोहोचले.
का वाढतायत दर?
तांब्याचा वार इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्सपासून कंज्युमर ड्युरेबल्स ते ऑटो प्रत्येक क्षेत्रात होतो. कोरोनाच्या माहासाथीतून थोडं बाहेर आल्यानं उद्योगांना पुन्हा चालना मिळण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे तांब्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळात तांब्याचं उत्पादनही कमी झालं आहे. त्यामुळे मागणी वाढली आणि पुरवठा कमी आहे. तांब्याची सर्वाधिक मागणी ही चीनमधून येताना दिसत आहे. या ठिकाणी जगातील उत्पादन होणाऱ्या तांब्यापैकी तब्बल ५० टक्के तांब्याचा उपयोग केला जातो. तांब्याचा सर्वाधिक वापर करणारा चीन हा देश आहे. इतकंच नाही तर आता सर्वजण इलेक्ट्रिक गाड्यांच्या दिशेनं वळू लागले आहेत आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेनं पुढे जात आहेत. अशात तांब्याचा वापर वाढला असून मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.