Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्याच्या आदेशामुळे तांबे टंचाईचे संकट

तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्याच्या आदेशामुळे तांबे टंचाईचे संकट

अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदान्त समूहाचा तुतिकोरिन येथील स्टरलाइट प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:34 AM2018-05-30T05:34:32+5:302018-05-30T05:34:32+5:30

अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदान्त समूहाचा तुतिकोरिन येथील स्टरलाइट प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश

Copper scarcity crisis due to the closure of the Turicorin project | तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्याच्या आदेशामुळे तांबे टंचाईचे संकट

तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्याच्या आदेशामुळे तांबे टंचाईचे संकट

नवी दिल्ली : अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदान्त समूहाचा तुतिकोरिन येथील स्टरलाइट प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत. त्यामुळे देशात तांबेटंचाई निर्माण होऊन तांब्याची आयात करावी लागणार आहे.
वेदान्तच्या तुतिकोरिन प्रकल्पातून वर्षाला ४ लाख टन तांब्याचे उत्पादन होते. या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात
आंदोलन करणाºया स्थानिक रहिवाशांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ जण ठार झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू सरकारने हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळास सोमवारी दिले.

तुतिकोरिन प्रकल्प बंद झाल्यामुळे देशातील तांबे उत्पादन जवळपास अर्ध्याने घटणार आहे. तसा हा प्रकल्प मार्चपासून देखभाल व दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. आता तो कायमस्वरूपी बंद झाला आहे. हा निर्णय दुर्दैवी असून, आम्ही अभ्यास करून पुढील कारवाईचा निर्णय घेऊ , असे वेदान्तने म्हटले आहे.
इकरा लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयंत रॉय यांनी सांगितले की, भारतात तांबे उत्पादन गरजेपेक्षा अधिक होत होते. आपण तांब्याची निर्यात करीत होतो. तुतिकोरिन प्रकल्प बंद झाल्यानंतर आपले उत्पादन ४० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे आपल्याला तांबे टंचाईचा सामना करावा लागेल.

जमीन वितरण रद्द
वेदान्तच्या तांबे उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी वितरित करण्यात आलेली जमीन तामिळनाडू सरकारने रद्द केली आहे. तामिळनाडू राज्य औद्योगिक प्रोत्साहन महामंडळाने हा निर्णय घेतला. या जमिनीची किंमत म्हणून वेदान्त समूहाकडून घेण्यात आलेली रक्कम कंपनीला परत करण्यात येईल, असे महामंडळाने
म्हटले आहे.

Web Title: Copper scarcity crisis due to the closure of the Turicorin project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.