Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोना संकटात भारतीय कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावर विश्वास वाढला

कोरोना संकटात भारतीय कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावर विश्वास वाढला

Indian employees : सर्वेक्षणात भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अमेरिकेतील सुमारे ४००० जणांच्या प्रतिक्रिया या सर्वेक्षणात नोंदविण्यात आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:01 AM2020-11-06T02:01:58+5:302020-11-06T06:18:29+5:30

Indian employees : सर्वेक्षणात भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अमेरिकेतील सुमारे ४००० जणांच्या प्रतिक्रिया या सर्वेक्षणात नोंदविण्यात आल्या.

The Corona crisis boosted the confidence of Indian employees in management | कोरोना संकटात भारतीय कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावर विश्वास वाढला

कोरोना संकटात भारतीय कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावर विश्वास वाढला

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातही सुमारे ५३ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावर विश्वास वाढला. जगभरात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण अल्टिमेट क्रोनोज समूहाने नोंदविले आहे. तसेच व्यवस्थापनाने आदर आणि आत्मसन्मान जपल्याच्याही भावना ४६ टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सर्वेक्षणात भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अमेरिकेतील सुमारे ४००० जणांच्या प्रतिक्रिया या सर्वेक्षणात नोंदविण्यात आल्या. कंपन्यांनी महामारी च्याकाळात किमान उपाययोजना तरी केल्या, असे ७२ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोनामध्ये  वावरताना चिंता वाटत असल्याचे मत सुमारे ३८ टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. 

देशप्रेम दिसून आले
आर्थिक संकटाच्या काळात नोकरी गमाविण्याची भारतीय कामगारांना इतर देशांच्या तुलनेत कमी चिंता आहे. चीनमध्ये सर्वाधिक ४४ टक्के, मेक्सिकोमध्ये ४१ टक्के, कॅनडामध्ये ४० तर अमेरिकेत ३७ टक्के कर्मचाऱ्यांना ही भीती आहे. भारतात हे प्रमाण ३२ टक्के आढळून आले.

Web Title: The Corona crisis boosted the confidence of Indian employees in management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.