Join us

काेराेनाने छाटले हवाई मालवाहतुकीचे पंख, मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीत ३५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:32 AM

प्रवासी संख्येपाठोपाठ मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीतही तब्बल ३५.३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

मुंबई : प्रवासी संख्येपाठोपाठ मुंबईविमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीतही तब्बल ३५.३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत झालेल्या मालवाहतुकीचा अहवाल नुकताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. (Corona cuts wings of air cargo, cargo from Mumbai airport drops by 35%)भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद करण्यात आली. परंतु, या काळात विमानाद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नाहीत. तरीही मालवाहतुकीत घट नोंदवली. लॉकडाऊनमुळे उद्योग बंद ठेवण्यात आल्याचा हा परिणाम असल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. रस्ते वाहतुकीवरही निर्बंध लागू केल्याने संपूर्ण वाहतूक साखळीवर त्याचा परिणाम झाला. नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर या क्षेत्राची चाके फिरू लागली. परंतु, कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत मालवाहतूक पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, मुंबईवरून होणाऱ्या मालवाहतुकीत २० टक्के, तर देशांतर्गत ४९.५० टक्के घट झाली आहे.

टॅग्स :विमानविमानतळमुंबई