Join us

‘कोरोना’मुळे भारतीय उद्योग, व्यवसायास फटका; आयातीवर परिणाम, पुरवठा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:38 AM

चीन हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या सुट्या भागांचा जगातील सर्वांत मोठा पुरवठादार आहे.

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना विषाणूमुळे भारतातील उद्योग व व्यवसायास फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विषाणू झपाट्याने पसरत असल्यामुळे सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. नव्या मोबाइल फोनचे लाँचिंग आणि उपलब्धता यावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.चीन हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या सुट्या भागांचा जगातील सर्वांत मोठा पुरवठादार आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमधील व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे शिओमी, विवो, ओप्पो, वनप्लस, टीसीएल, लेनोव्हो, अ‍ॅपल आणि रेडमी यांसारख्या काही बड्या ब्रँडवर थेट परिणाम होणार आहे. याशिवाय फॉक्सकॉन आणि स्कायवर्थ यांसारखे टीव्ही उत्पादक चिनी सुट्या भागांवरच अवलंबून आहेत.आॅटो एक्स्पोत खबरदारीनॉयडा येथे ५ ते १२ फेब्रुवारी या काळात ‘आॅटो एक्स्पो’ होत आहे. सियाक, बीवायडी, ग्रेट वॉल आणि एफएडब्ल्यू यांसारख्या बड्या चिनी कंपन्या यात सहभागी होत आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊशकते. वाहन उद्योगातील संघटना सियामचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले की, ‘आॅटो एक्स्पो’च्या स्थळावर आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

टॅग्स :व्यवसायबजेट