नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच, मंदीचे सावटही दरवाजाबाहेर उभे राहताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कार्यालयातील कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी कंपन्यांनी तयारी केली आहे. यामध्ये टाटा स्टील असो वा फ्लिपकार्ट, मॅरिको, एलअँडटी माइंडट्री, बोस्टन कंसल्टिंग ग्रुप किंवा इतर कोणतेही कंपनी असो.
सर्व कंपन्यांनी 2023 साठी आपली रणनीती तयार केली आहे. मात्र, यावेळी जग आणि भारत कोरोनाबाबत जागरूक असून पूर्वीपेक्षा चांगली तयारी केली आहे. 2023 मध्येही बहुतांश कंपन्या हायब्रीड मॉडेलवर काम करणार आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ घरून काम करावे लागणार नाही किंवा त्यांना कार्यालयात जावे लागणार नाही.
वर्क-लाइफ बॅलन्स होईल चांगलेकंपन्यांचे म्हणणे आहे की, हायब्रीड मॉडेलमुळे कर्मचाऱ्यांचे वर्क-लाइफ बॅलन्स चांगले राहते. दुसरीकडे, कर्मचारी आपल्या फ्लॅक्सीबिलिटीनुसार काम करू शकतात. या मॉडेलची खास गोष्ट म्हणजे ते मालक आणि कर्मचारी दोघांच्याही गरजा पूर्ण करते. जिथे कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठी वेळ हवा असतो, तिथे टीमसोबत काम करण्याचा अनुभवही येतो. कंपन्यांना अधिकाधिक लोकांना ऑफिसमध्ये बोलावायचे आहे, परंतु कंपन्यांचे म्हणणे आहे की, जगाची कार्यपद्धती बदलली आहे. म्हणूनच कंपन्यांना वाटते की हायब्रीड मॉडेलमध्ये कर्मचारी अधिक चांगले काम करू शकतात.
कंपन्यांशी संबंधित तज्ज्ञ काय म्हणतात?गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे कर्मचारी हायब्रिड मॉडेलवर काम करत आहेत. आम्ही हे पुढे चालू ठेवू आणि आमचा दृष्टिकोन अशा प्रकारे ठेवू की ते कर्मचारी आणि बाह्य घटक या दोघांच्याही गरजा पूर्ण करेल, असे वर्क कल्चरमधील या बदलाबाबत फ्लिपकार्टचे चीफ पीपुल ऑफिसर कृष्णा राघवन यांनी सांगितले.
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये बहुतेक कर्मचारी कार्यालये किंवा कामाच्या दुकानात परतले आहेत. टाटा स्टीलची लवचिक कार्य मॉडेल राखण्याची योजना आहे. कंपनीच्या ब्लू कॉलर म्हणजेच शॉप फ्लोरवर कार करणाऱ्या कर्मचार्यांना कारखान्यात यावे लागत आहे. दुसरीकडे, कंपनीने आपले ऑफिशियल वर्क दाखविणाऱ्या टीमला वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रीड मोडमध्ये काम करण्याचा ऑप्शन दिला.