Join us

Corona Second Wave: लॉकडाऊन उठताच पॅकेजची घोषणा होणार? जाणून घ्या दुसऱ्या लाटेचा काय झाला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:34 PM

Will the package be announced after Lockdown: गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरण्य़ासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागलेला लॉकडाऊन (Lockdown) विविध राज्ये पुन्हा उठविणार आहेत. यानंतर केंद्र सरकार आर्थिक पॅकेजची (Finance package) घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला उभारण्याच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करू शकते. (Governments can announce relief package after Lockdown.)

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरण्य़ासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. ब्रोकरेज कंपनी बर्नस्टीनने बुधवारी म्हटले की, एप्रिल आणि मे मध्ये आर्थिक घडामोडींमध्ये मोठी घट दिसत आहे. यामुळे सरकार या लॉकडाऊनमध्ये सर्वात प्रभावित छोटे व्यापारी आणि स्वयंरोजगारांसाठी हे पॅकेज आणू शकते. 

ब्रोकरेज कंपनीने सांगितले की, मे मध्ये विजेचा वापरही चार टक्क्यांनी आणि ईंधनाचा खपदेखील 16 टक्क्यांनी कमी झाला आहे. ई-वे बिलमध्ये 16 टक्क्यांची घट झाली आहे. दुकाने बंद झाल्याने कंपन्यांच्या उत्पादनांचा खपही कमी झाला आहे. रिटेल दुकाने बंद झाल्याने उत्पादन वाढविण्याची क्षमता कमी झाली आहे. पुरवठ्यावर मात्र, तेवढा परिणाम झालेला नाही. कारण अनेक राज्यांमध्ये कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांवर प्रतिबंध कमी आहेत. 

बर्नस्टीनने सांगितले, यावेळी आम्ही जे पाहत आहोत, त्यामध्ये अर्थव्यवस्थेमुळे खळबळ उडविणारी कोणतीही गोष्ट नाहीय. परंतू आर्थिक मोर्च्यावर हालत थोडी बिघडलेली आहे. मात्र, गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनपेक्षा कमी गतीने. यावेळी पुढील काही महिने अर्थव्य़वस्थेची गती धीमी असू शकते. कारण गेल्या वेळी देखील लॉकडाऊन संपल्यानंतर काही महिने अर्थव्वस्थेवर प्रभाव दिसला होता. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्था