Lokmat Money > बिझनेस न्यूज > Corona vaccine: कोविड औषधांना  जीएसटी माफी देण्याचा विचार  

Corona vaccine: कोविड औषधांना  जीएसटी माफी देण्याचा विचार  

Corona vaccine: कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक साहित्यावरील जीएसटी माफ करण्याची मागणी अनेक राज्यांनी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:06 AM2021-05-27T10:06:03+5:302021-05-27T10:06:35+5:30

Corona vaccine: कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक साहित्यावरील जीएसटी माफ करण्याची मागणी अनेक राज्यांनी केली आहे.

Corona vaccine: Consideration of GST exemption for covid drugs | Corona vaccine: कोविड औषधांना  जीएसटी माफी देण्याचा विचार  

Corona vaccine: कोविड औषधांना  जीएसटी माफी देण्याचा विचार  

नवी दिल्ली : कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे आणि इतर साहित्यावरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) माफ करण्याचा विचार सरकार करीत आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक साहित्यावरील जीएसटी माफ करण्याची मागणी अनेक राज्यांनी केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जीएसटी परिषदेत ठेवण्यात येणार आहे. जीएसटी परिषदेची बैठक येत्या शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

कोविडवरील औषधांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणारा कच्चा माल व साहित्य हे त्याच  उद्देशाने वापरले जात आहे,  याची निश्चिती करण्यासाठी ‘अंतिम-वापर प्रमाणन’ अत्यावश्यक  असेल.  पश्चिम बंगाल आणि पंजाबसह अनेक राज्यांनी जीएसटी माफी प्रस्तावित केली आहे. 

Web Title: Corona vaccine: Consideration of GST exemption for covid drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.