Lokmat Money > बिझनेस न्यूज > Corona vaccine : कोरोना लसीच्या बाजारात भारताची मोठी आघाडी, विविध देशांना आतापर्यंत केली सुमारे एक कोटी डोसची विक्री

Corona vaccine : कोरोना लसीच्या बाजारात भारताची मोठी आघाडी, विविध देशांना आतापर्यंत केली सुमारे एक कोटी डोसची विक्री

Corona vaccine : कोरोना लसींना मान्यता मिळाल्यापासून भारताने सुमारे एक कोटी कोरोना लसींची विक्री केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 06:09 AM2021-02-05T06:09:34+5:302021-02-05T06:10:10+5:30

Corona vaccine : कोरोना लसींना मान्यता मिळाल्यापासून भारताने सुमारे एक कोटी कोरोना लसींची विक्री केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Corona vaccine: India's biggest leader in the corona vaccine market, has sold nearly one crore doses to various countries so far. | Corona vaccine : कोरोना लसीच्या बाजारात भारताची मोठी आघाडी, विविध देशांना आतापर्यंत केली सुमारे एक कोटी डोसची विक्री

Corona vaccine : कोरोना लसीच्या बाजारात भारताची मोठी आघाडी, विविध देशांना आतापर्यंत केली सुमारे एक कोटी डोसची विक्री

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होत असतानाचा कोरोना लसीचे उत्पादन आणि विक्रीच्या क्षेत्रात भारताने मोठी आघाडी घेतली आहे. कोरोना लसींना मान्यता मिळाल्यापासून भारताने सुमारे एक कोटी कोरोना लसींची विक्री केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोनाकाळात आतापर्यंत अन्य देशांना लसींचे सुमारे ५६ लाख डोस हे मदत म्हणून देण्यात आले आहेत. तर सुमारे एक कोटी डोसची विक्री करण्यात आली आहेत.

श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतातील लसींचे डोस कॅरेबियन देश, पॅसिफिक महासागरातील बेटांवर वसलेले देश, निकारगुआ, अफगाणिस्तान आणि मंगोलिया आदी देशांमध्ये पुढील आठवड्यांमध्ये जाणार आहेत. तसेच आतापर्यंत आम्ही कोविड-१९ चे डोस भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, मॉरिशस, सेशेल्स, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील, मोरक्को, बहरीन, ओमान, कुवेत, इजिप्त, अल्जेरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना दिले आहेत.

Web Title: Corona vaccine: India's biggest leader in the corona vaccine market, has sold nearly one crore doses to various countries so far.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.