Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस

CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस

Corona Vaccine Reliance Life Sciences: डीसीजीआयची मंजुरी मिळाल्यानंतर रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनी पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 06:36 AM2021-08-28T06:36:45+5:302021-08-28T06:37:08+5:30

Corona Vaccine Reliance Life Sciences: डीसीजीआयची मंजुरी मिळाल्यानंतर रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनी पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु शकते.

Corona Vaccine by Reliance Life Sciences; Committee recommendation to trials pdc | CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस

CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस

नवी दिल्ली : रिलायन्स लाईफ सायन्सेसला दोन डोसच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या पहिल्या टप्प्यातील चिकित्सालयीन चाचणी करण्यास मंजुरी देण्याची शिफारस गुरुवारी विषय तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे. आता रिलायन्स लाईफ सायन्सेसला पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यासाठी भारतीय औषधी महानियंत्रकाची (डीसीजीआय) मंजुरी घ्यावी लागेल.

डीसीजीआयची मंजुरी मिळाल्यानंतर रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनी पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु शकते.विषय तज्ज्ञ समितीने रिलायन्स लाईफ सायन्सेसचा अर्ज मंजुर करुन पहिल्या टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्याची शिफारस गुरुवारच्या बैठकीत केली.ही लस रिकॉम्बिनन्ट प्रोटीन आधारित (जनुकीय, पेशी पुन:संयोग ) आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसची स्वत:चे कोविड-१९ चाचणी केंद्र आहे. 

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह दहा ठिकाणी लसीची पहिली चाचणी केली जाईल. चाचणीचा पहिला टप्पा दोन महिने किंवा ५८ दिवसांचा असतो. लसीची सुरक्षा, क्षमता आणि प्रभाव याची माहिती घेणे, हा चाचणीमागचा उद्देश असतो.

रिलायन्स लाईफ सायन्सेस ही कंपनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील एक कंपनी आहे. बायो-थेराप्युटिक्स, फार्मास्युटिकल्स, क्लिनिकल रिसर्च, मॉल्यूकलर मेडीसिन आदी क्षेत्रात व्यावसायिक संधी विकसित करणारी रिलायन्स लाईफ सायन्सेस संशोधन संचालित कंपनी आहे. कंपनीच्या नवीन मुंबईतील केंद्रात ही लस विकसित केली जात आहे.

सहा लसींना मंजुरी
डीसीजीआयने आतापर्यंत आपात्कालिन वापरासाठी सहा लशींना मंजुरी दिली. यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, रशियाची स्पुतनिक-व्ही आणि मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायकोव्ही-डी या अमेरिकन कंपन्यांच्या लशींचा समावेश आहे.

Web Title: Corona Vaccine by Reliance Life Sciences; Committee recommendation to trials pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.