Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोना संकटानंतर जगण्याची पद्धत बदलेल; अर्थव्यवस्थेत ५ ते १० टक्के होईल घट

कोरोना संकटानंतर जगण्याची पद्धत बदलेल; अर्थव्यवस्थेत ५ ते १० टक्के होईल घट

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि गुंतवणूक विशेषज्ञ जयेंद्र भाई शाह यांचे असे म्हणणे आहे की, या कोरोना संकटानंतर अर्थशास्त्राच्या नजरेतून जीवन जगण्याची पद्धत बदलून जाईल. काही क्षेत्रांवर खूपच वाईट परिणाम होईल, तर काही क्षेत्र असेही आहेत जिथे काळासोबत उल्लेखनीय प्रगती होईल. आपण काहीही केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत पाच ते दहा टक्क्यांपर्यंत घट होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 03:07 AM2020-08-23T03:07:55+5:302020-08-23T03:08:10+5:30

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि गुंतवणूक विशेषज्ञ जयेंद्र भाई शाह यांचे असे म्हणणे आहे की, या कोरोना संकटानंतर अर्थशास्त्राच्या नजरेतून जीवन जगण्याची पद्धत बदलून जाईल. काही क्षेत्रांवर खूपच वाईट परिणाम होईल, तर काही क्षेत्र असेही आहेत जिथे काळासोबत उल्लेखनीय प्रगती होईल. आपण काहीही केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत पाच ते दहा टक्क्यांपर्यंत घट होईल.

Corona will change the way of life after the crisis; The economy will shrink by 5 to 10 percent | कोरोना संकटानंतर जगण्याची पद्धत बदलेल; अर्थव्यवस्थेत ५ ते १० टक्के होईल घट

कोरोना संकटानंतर जगण्याची पद्धत बदलेल; अर्थव्यवस्थेत ५ ते १० टक्के होईल घट

विकास मिश्र

प्रश्न : कोविड-१९ महामारीनंतर जग कसे असेल? आपली आर्थिक स्थिती कशी असेल व आपण त्यातून कसे वर येणार?
शाह : हे संकट काही एक वा दोन महिने राहणारे नाही किंवा स्थानिक समस्याही नाही. तसेच ते सगळ्या जगासमोर आहे. जो प्रश्न जागतिक असतो व त्याचे परिणाम माहीत नसतात तो नेहमीच धोकादायक असतो. प्रत्येक व्यक्ती येत्या दोन- चार- पाच महिन्यांत असे काही घडेल व संकट दूर होईल या आशेवर आहे. लस यावी. मला स्पष्टपणे दिसते आहे की, जीवन आर्थिकदृष्ट्या जगण्याची रीतच बदलून जाईल. याचा अर्थ आर्थिक स्तरावर आयुष्य बदलून जाईल.

प्रश्न : कोणत्या क्षेत्रांत तुम्हाला जास्त परिवर्तन दिसते किंवा कोणती क्षेत्रे जास्त प्रभावित आहेत?
शाह : सगळ्यात आधी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवर गंभीर प्रभाव पडला आहे व तो प्रदीर्घ काळ असेल. हा उद्योग दोन कारणांनी चालतो. एक-बिझनेस ट्रॅव्हल आणि दुसरा प्लेझर ट्रॅव्हल. तिसरे कारण इव्हेंट. त्याचा वाटा जास्त नसतो. मला वाटते की, प्लेझर ट्रॅव्हल परत सुरू होईल; पण त्याला काही वेळ लागेल. आज स्थिती गंभीर असून, आपण घाबरलेलो आहोत; पण जेव्हा परिस्थितीत सुधारणा होईल तेव्हा लोक फिरायला जातीलच; परंतु व्यवसायासाठी कमी जातील. जाणे अनिवार्य आहे का ई-कान्फरन्स करणे योग्य आहे याचा विचार लोक करतील.

प्रश्न : शंभर टक्के परिवर्तन होईल, असे तुम्ही म्हणणार का?
शाह : मी नाही म्हणणार. प्रत्यक्ष भेटी पूर्णपणे संपणार नाहीत; परंतु आजसारखीच स्थिती असणार नाही. जर डिजिटलायझेशन वाढत असेल, तर बिझनेस ट्रॅव्हल कमी होईल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे नुकसान होईल.

प्रश्न : बँकिंग क्षेत्राची स्थिती कशी असेल आणि कॉर्पोरेट किंवा लहान उद्योगांचे काय होणार?
शाह : निश्चितच काही सेक्टर चांगले काम करतील, तर काही नाही. एफएमसीजीला चालना मिळेल. कमर्शिअल रिअल इस्टेट प्रदीर्घ काळ नकारात्मक असेल, शेतकरी योग्य करीत असून, ते तसे करतीलही. सरकारने इंटरेस्ट पेमेंट मोनेरेटोरियम दिले आहे, लघु उद्योगांच्या मदतीसाठी ते पुढे आले. बँकेबाबत बोलायचे झाल्यास बँकेचा व्यवसाय पैसा खेळता आहे की नाही, यावर अवलंबून असतो. कर्ज घेणाऱ्याच्या नजरेतून पाहिले, तर प्रत्येक व्यक्ती त्रासलेली आहे. बँकेच्या नजरेतून पाहिले, तर जर कर्ज योग्य व्यक्तीने घेतले, तर ते परत मिळेल; पण सगळ्याच ठिकाणी असे होत नाही. मग बँकेसमोर पर्याय कोणता? एक तर त्यांनी ते कर्ज रिस्ट्रक्चर करू नये. सूट दिली तरी अडचण. जर रिस्ट्रक्चर केले तर बँकेची अडचण ही आहे की, प्रदीर्घ काळ पैसा अडकून पडतो. फ्रेश मनी नसेल व कोणालाही कर्ज मिळणार नाही. याचे गंभीर परिणाम होतील. एनपीए वाढेल. त्याचे दूरगामी परिणाम होतील व अर्थव्यवस्थेची हानी होईल. एक सकारात्मक भाग असा की, आॅनलाईन आणि डिजिटल पेमेंट वाढेल. आता लोकांना वाटत आहे की, बँकेत जाऊन पैसे काढण्यास काही अर्थ नाही. ते क्रेडिट कार्डने पेमेंट करीत आहेत.

प्रश्न : अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चढता ठेवता येईल, अशा उपायाची काही आशा आहे?
शाह : मला तर स्पष्ट दिसत आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेत ५ ते १० टक्क्यांपर्यंत घट होईल. यावर्षी ती वाढण्याचा विचार सोडून द्या. सरकारकडे एवढी आर्थिक शक्ती आहे का की, आर्थिक बाजू सक्रिय करण्यासाठी पैसा बाजारात ओतू शकेल? असा पैसा ओतणे अमेरिकेला शक्य आहे. मला असे वाटते की, सरकार जेवढे करू शकते तेवढे करीत आहे; परंतु आपल्याकडे तेवढी शक्ती आणि क्षमता नाही. जर मला एक वर्षासाठी पैसा हवा आहे, तर तुम्ही तो फक्त चार महिन्यांसाठी देणार असाल, तर उपाय कसा शक्य आहे? आपलीच नाही अमेरिका आणि दुसºया मोठ्या देशांची अर्थव्यवस्थाही घटत जाणार आहे.

Web Title: Corona will change the way of life after the crisis; The economy will shrink by 5 to 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.