नवी दिल्ली : कोरोनरी स्टेंटच्या दरात ८५ टक्के कपात करत सरकारने रुग्णांना दिलासा दिला. मेटल स्टेंटचे दर ७,२६० रुपये, तर औषधे मिसळली जाणाऱ्या स्टेंटचे दर २९,६०० रुपये झाले आहेत. सद्या या स्टेंटचे दर २५ हजार रुपये ते १.९८ लाख रुपयांपर्यंत आहेत. एनपीपीएच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, हॉस्पिटल सर्वाधिक नफा स्टेंटच्या माध्यमातून कमवतात. यातून ६५४ टक्के नफा कमविला जातो.
नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइजिंग आॅथॉरिटीने (एनपीपीए) एका अधिसूचनेत म्हटले की, त्यांनी मेटल स्टेंट आणि बायोरिसॉर्बेबल वस्क्युलर स्काफोल्ड (बीव्हीएस) या स्टेंटच्या दरात कपात करत, त्यांचे दर निश्चित केले आहेत. कोरोनरी स्टेंट हे ट्युबच्या आकाराची असते. हृदय रोगाच्या उपचारासाठी याचा उपयोग होतो. हृदयात रक्त प्रवाहित करणाऱ्या रक्तवाहिन्यांत ही स्टेंट लावली जाते.
एनपीपीएने या निर्णयाबाबत सांगितले की, स्टेंटच्या व्यवहारात अनैतिकपणे अधिक रक्कम घेतली जाते. त्यामुळे रुग्णांना याचा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे दरात सीमा निर्धारित करण्यात आली. जेणेकरून, रुग्णांना दिलासा मिळू शकेल. सरकारने जुलै २०१६ मध्ये कोरोनरी स्टेंटला आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत टाकले होते, तर डिसेंबर २०१६ मध्ये औषधी मूल्य नियंत्रण आदेशाच्या अनुसूचित सहभागी केले.
कोरोनरी स्टेंट झाले स्वस्त
कोरोनरी स्टेंटच्या दरात ८५ टक्के कपात करत सरकारने रुग्णांना दिलासा दिला
By admin | Published: February 14, 2017 11:51 PM2017-02-14T23:51:55+5:302017-02-14T23:51:55+5:30