Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन

कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन

एका मुलाखतीत सुब्रमण्यन यांनी म्हटले की, जेव्हा अर्थव्यवस्था वृद्धी पावते तेव्हा अनेक जण असमानतेबद्दल तक्रार करीत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:58 AM2021-07-06T09:58:45+5:302021-07-06T09:59:27+5:30

एका मुलाखतीत सुब्रमण्यन यांनी म्हटले की, जेव्हा अर्थव्यवस्था वृद्धी पावते तेव्हा अनेक जण असमानतेबद्दल तक्रार करीत असतात.

Corona's blow hit the poor more - Subramanian | कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन

कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीचा फटका श्रीमंतांपेक्षा गरिबांनाच अधिक बसला आहे, असे प्रतिपादन मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी केले आहे. अर्थव्यवस्थेसाठी वृद्धी का महत्त्वाची आहे, हे सांगणारा फलक म्हणून आपण कोविड-१९ साथीच्या वर्षाकडे पाहिले पाहिजे, असेही सुब्रमण्यन यांनी सांगितले.

एका मुलाखतीत सुब्रमण्यन यांनी म्हटले की, जेव्हा अर्थव्यवस्था वृद्धी पावते तेव्हा अनेक जण असमानतेबद्दल तक्रार करीत असतात. पण साथीच्या वर्षात वृद्धी प्रचंड घसरली आहे आणि याचा फटका दुर्बलांनाच अधिक बसला आहे, मग त्या संस्था असोत की व्यक्ती. मोठ्या कंपन्या व्यवस्थित काम करीत आहेत. 
छोट्या कंपन्या मात्र बंद पडत आहेत. तेच व्यक्तींच्या बाबतीत घडताना दिसत आहे. श्रीमंत लोकांवर साथीचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. गरीब लोक मात्र संकटात सापडले आहे.

सुब्रमण्यन यांनी सांगितले की, याचा सोपा अर्थ असा आहे की, जेव्हा जीडीपी घसरतो, तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका दुर्बल घटकांनाच बसतो. त्यामुळे अर्थव्यवस्था वृद्धी पावत राहणे आवश्यक आहे.

Web Title: Corona's blow hit the poor more - Subramanian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.