मुंबई- कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना जायबंदी करण्यासाठी सर्वच देश प्रयत्नशील आहेत. भारतातही केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारेही खांद्याला खांदा लावून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. भारतात कोरोना हा सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. पण ज्या पद्धतीनं तो पसरतोय, त्यामुळे तो केव्हाही तिसऱ्या टप्प्यात पोहोचू शकतो. कोरोनावर मात करण्यासाठी आता अनेक प्रतिष्ठित व्यक्ती पुढे सरसावले आहेत.उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी व्हेंटिलेटर्स तयार करण्यापासून, महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्टही उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच स्वतःच्या पगारातील 100 टक्के वेतनही आनंद महिंद्रा कोरोनाग्रस्तांना देणार आहेत.
Coronavirus : व्हेंटिलेटर्स, 100 टक्के पगार अन् राहण्यासाठी रिसॉर्टही; आनंद महिंद्रांचे जीवन'दान'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 2:11 PM