मुंबई – अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्टी आणि विश्रांती देण्यास सुरूवात केली आहे. कोविड १९ च्या गंभीर परिस्थितीत कर्मचाऱ्यांमधील तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी कंपन्यांनी नवा मार्ग शोधून काढला आहे. ज्या कंपन्या अतिरिक्त सुट्टी देत आहेत त्यात हिंदुस्तान युनिलीवर, डेलॉय, स्विगी, पीडब्ल्यूसी, गोदरेज यांचा समावेश आहे. या कंपन्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला किंवा महिन्याला सुट्टी देत आहेत. जेणेकरून कर्मचारी मानसिक तणापासून दूर राहतील.
तर दुसरीकडे काही कंपन्यांनी एक आराखडा केला आहे. ज्याठिकाणी कर्मचारी हॉलिडेजसाठी त्यांचे शेयर कॉन्ट्रिब्यूट करू शकतील. काही कंपन्या अशाही आहेत ज्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक काही विश्रांती आणि सुट्टीवर पाठवत आहेत. कर्मचारी ओवरवर्क करत नाही ना. तणावामुळे तो कामासाठी जास्त वेळ देत आहे यावरून कंपन्या टीम हेड्स आणि मानसोपचार तज्त्रांसोबत सल्ला घेत आहेत
डेलॉय इंडियाचा हॉलिडे पूल
डेलॉय इंडियाने एक हॉलिडे पूल क्रिएट केला आहे. ज्याचा वापर कोणताही कर्मचारी त्याच्या निश्चित सुट्टीशिवाय अतिरिक्त सुट्टी घेण्यासाठी करू शकतो. डेलॉय इंडियामध्ये पार्टनर आणि चीफ टँलेंट ऑफिसर एस. वी नाथन यांनी सांगितले की, शेयर्ड लीव बँक नॉन कोविड मेडिकल इमरजेन्सीत मदत करत आहे. यात कर्मचारी २६०० दिवसापेक्षा अधिक सुट्टीचा पूल कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. कर्मचारी एकमेकांना मदत करत असल्याचं दिसून येतं.
स्विगीने काय केलं?
फूड डिलीवरी कंपनी स्विगीने अलीकडे ४ डे वीकची व्यवस्था केली आहे. म्हणजे कंपनी कर्मचाऱ्यांना आता आठवड्याला ३ सुट्टी देत आहे. स्विगीचे एचआर हेड गिरीश मेनन म्हणाले की, कर्मचाऱ्यांना कंपनीने ईमेल पाठवला आहे त्यात लिहिलंय की, कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार आठवड्यातून ४ दिवस कामकाज करू शकतात आणि बाकीचे दिवस आराम घेऊ शकतात. त्याचसोबत कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वैयक्तित सुट्टीचीही व्यवस्था केली आहे असंही एचआरने सांगितले.
पीडब्ल्यूसी इंडियानेही अतिरिक्त सुट्टी आणि कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. एप्रिलमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती तसेच अनेकांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला होता. या कठीण काळात कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कंपनीने नवीन टेक्निक शोधून काढली. त्यात केवळ शारीरीक नव्हे तर मानसिक आरोग्याकडेची विशेष लक्ष दिलं जात आहे.
कंपनीने अलीकडेच एक्सटेंडेड पर्सनल टाइन ऑफची घोषणा केली आहे. ज्यात कर्मचारी महिन्याला ३ पेड लीव घेऊ शकतात. कर्मचाऱ्याला कोविड झाल्यानंतर दिल्या जाणाऱ्या १४ दिवसांच्या सुट्टी वगळता या ३ दिवस जास्त सुट्ट्या मिळणार आहेत. या सुट्ट्या कुटुंबातील कोणी कोविड संक्रमित आढळलं असेल तर त्याच्या देखभालीसाठी मिळणार आहे. डेलॉयसारखं पीडब्ल्यूसीनेही हॉलिडे पूल बनवलं आहे.