संयुक्त राष्ट्र : कोविड-१९ च्या जगव्यापी साथीच्या फटक्याने २०२१ पर्यंत दक्षिण आशियात महिला गरीब होण्याचा दर वाढेल. संयुक्त राष्टÑाच्या नवीन आकडेवारीनुसार २५ ते ३४ वर्षे वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत पुढच्या दशकांत सर्वाधिक महिलांना दारिद्र्याची झळ सोसावी
लागेल.
२०२१ पर्यंत ४.७ कोटींहून अधिक महिला आणि मुली अति गरिबीच्या फेऱ्यात सापडतील. परिणामी, एवढ्या लोकसंख्येला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांत करण्यात आलेल्या प्रगतीची पीछेहाट होईल.
कोविडच्या माºयाने अर्थव्यवस्था कोलमडल्याने दक्षिण आशियात गरिबीचे प्रमाण वाढेल. कोविड साथीचा उद्रेक होण्यापूर्वी दक्षिण आशियात महिलांतील गरिबीचा दर २०२१ मध्ये १० टक्के राहील, असा अंदाज होता; परंतु आता हे प्रमाण १३ टक्क्यांवर जाईल.
कोरोनाच्या संकटाने अत्याधिक गरिबीत राहणाºया एकूण महिलांची संख्या ४३.५ कोटी होईल. २०३० पर्यंत ही संख्या कोविड-१९ साथीच्या आधीच्या स्थितीत पोहोचू शकणार नाही.
आर्थिक व्यवस्थेला दोष
एकूणच समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेच्या रचनेतील उणिवांमुळे महिला अत्याधिक गरीब राहिल्या आहेत, याकडे संयुक्त राष्टÑ महिला संस्थेच्या कार्यकारी संचालक फुमजाईल म्लाम्बो नगकुका यांनी लक्ष वेधले आहे.
शिक्षण, कुटुंब नियोजन, समान वेतन आणि सामाजिक सुरक्षेसंदर्भात सरकारने सर्वंकष योजना अमलात आणल्यास दहा कोटी महिला आणि मुलींना दारिद्र्याच्या विळख्यातून बाहेर काढता येऊ शकते, असे यूएनडीपीचे प्रशासक एचेम स्टेनर यांनी म्हटले आहे.
coronavirus: कोरोनामुळे ४.७ कोटी महिला, मुलींना सोसावी लागेल गरिबी, युनोचा अहवाल
२०२१ पर्यंत ४.७ कोटींहून अधिक महिला आणि मुली अति गरिबीच्या फेऱ्यात सापडतील. परिणामी, एवढ्या लोकसंख्येला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांत करण्यात आलेल्या प्रगतीची पीछेहाट होईल.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:09 AM2020-09-04T06:09:08+5:302020-09-04T06:10:00+5:30