मुंबई - एकीकडे देशात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच आर्थिक आघाडीवरून देशासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक बँकेने दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थासाठीचा आपला अंदाज जाहीर केला असून, या अहवालानुसार 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी पाच टक्के राहण्याची शक्यता आहे. तर 2020-21 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर मोठ्या प्रमाणात घसरून केवळ 2.8 टक्के राहण्याची शक्यता जागतिक बँकेने वर्तवली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्तीचे वातावरण असतानाच कोरोना विषाणूचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे दळणवळण आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर घटून 2.8 टक्के राहण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक पातळीवरही मंदीची परस्थिती असल्याने देशांतर्गत गुंतवणुकीत सुधारणा होण्यासही वेळ लागण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
coronavirus : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला बसणार धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये होणार मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 9:32 PM
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्तीचे वातावरण असतानाच कोरोना विषाणूचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेने दिला आहे.
ठळक मुद्देजागतिक बँकेने दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थासाठीचा आपला अंदाज जाहीर केला आहे2020-21 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर मोठ्या प्रमाणात घसरून केवळ 2.8 टक्के राहण्याची शक्यता जागतिक पातळीवरही मंदीची परस्थिती असल्याने देशांतर्गत गुंतवणुकीत सुधारणा होण्यासही वेळ लागण्याची शक्यता