नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. दरम्यान, देशातील ग्रामीण भागात आता शहरांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे, असे निरीक्षण देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नोंदवले आहे. तसेच पर्यटन आणि दळणवळण उद्योगांचे कोरोनामुळे १० ते १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती सीआयआयने व्यक्त केली आहे. तसे झाल्यास देशातील सुमारे तीन ते चार कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.देशातील शहरी भागात धुमाकूळ घातल्यानंतर आता कोरोनाचा ग्रामीण भागांमध्ये वेगाने फैलाव होऊ लागला आहे. एसबीआयने भारतीय अर्थव्यवस्थेवरील आपल्या नव्या अहवालामध्ये देशातील ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात देशातील ग्रामीण भागात कोरोनाचे ५४ टक्के रुग्ण सापडले आहेत.ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्यांचे ग्रॉस स्टेट डेमेस्टिक प्रॉडक्ट १६.८ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. तसेच याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यांच्या ग्रॉस्ट स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये झालेल्या घटीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १४.२ टक्के राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, चालू आर्थिक वर्षात आर्थिक घडामोडींमुळे जीडीपीचा विकासदर घटून १६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा दर २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवली गेली होती. सीआयआय़च्या अंदाजानुसार पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाला १० लाख कोटींहून अधिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या जाण्याची भीती आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी