मुंबई : कोविड-१९ लॉकडाउनमुळे चालू आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये भारताचा जीडीपी १ टक्क्याने कमी होण्याचा अंदाज सिंगापूरस्थित गुंतवणूक बँक डीबीएस बँकेने व्यक्त केला आहे.
भारतात सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ लॉकडाउन जूनअखेर संपेल आणि चालू आर्थिक वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत सर्व औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे कार्यरत होतील. अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी मान्सून सामान्य जीडीपीच्या कमीतकमी ३ टक्क्यापर्यंत राहील. यापैकी कोणतेही मापदंड
पूर्ण न केल्यास निकाल भिन्न असू शकतात, असे डीबीएस बँकेने गृहित धरले आहे.
सरकारची वित्तीय तूट जीडीपीच्या सध्याच्या ३.५० टक्क्यांवरून १०.५० टक्क्यावर जाईल आणि सरकारी कर्ज सध्याच्या ४० टक्क्यांवरून जीडीपीच्या ७५ टक्क्यावर जातील.
रिझर्व्ह बँक
आॅफ इंडियाने (आरबीआय) अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या स्वस्त तरलता उपायांना मिळालेला कमकुवत प्रतिसाद पाहता, डीबीएस बँकेने आपले निष्कर्ष काढले आहेत.
coronavirus: देशाचा जीडीपी कमी होण्याचा अंदाज
भारतात सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ लॉकडाउन जूनअखेर संपेल आणि चालू आर्थिक वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत सर्व औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे कार्यरत होतील.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:40 AM2020-05-11T00:40:06+5:302020-05-11T00:41:09+5:30