Lokmat Money > बिझनेस न्यूज > coronavirus: कोरोनाचा धोका वाढल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३१ मेपर्यंत निर्बंध, डीजीसीएचा निर्णय

coronavirus: कोरोनाचा धोका वाढल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३१ मेपर्यंत निर्बंध, डीजीसीएचा निर्णय

coronavirus in India :

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:49 PM2021-04-30T16:49:00+5:302021-04-30T16:49:21+5:30

coronavirus in India :

coronavirus: DGCA decides to extends ban international flights till May 31 | coronavirus: कोरोनाचा धोका वाढल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३१ मेपर्यंत निर्बंध, डीजीसीएचा निर्णय

coronavirus: कोरोनाचा धोका वाढल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३१ मेपर्यंत निर्बंध, डीजीसीएचा निर्णय

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध ३१ मे २०२१ पर्यंत  वाढवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय ऑल-कार्गो ऑपरेशन आणि उड्डाणांवर लागू राहणात नाहीत. तसेच आवश्यकता भासल्यावर काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर संबंधित ऑथॉरिटीच्या मान्यतेनंतर विमान फेऱ्या चालवल्या जातील. ( DGCA decides to extends ban international flights till May 31)

 नागरी विमान वाहतूक संचालनालयाने याबाबत जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय वेळेनुसार ३१ मे २०२१ च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत निर्धारित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान वाहतूक सेवा निलंबित राहणार आहे. याकाळात आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना सक्षम अधिकाऱ्याकडून निर्धारित मार्गांवर ठरावीक कारणांच्या आधारावर चालवण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. 

कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉतडाऊनच्या वेळी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध घातले होते. त्यानंतर याबाबत डीजीसीएकडून वेळोवेळी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध होत आल्या आहेत. 

विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यावर एअरफेअर कॅप लावण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये डीजीसीएने किमान प्राइस बँडवर १० टक्के आणि कमाल प्राइम बँडवर ३० टक्क्यांपर्यंतची मर्यादा वाढवली आहे. 

Web Title: coronavirus: DGCA decides to extends ban international flights till May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.