नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीचा पर्यटन व हवाई वाहतूक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांची गंभीर दखल घेण्याची तृणमूल काँग्रेसची सूचना वाहतूक, हवाई व पर्यटनविषयक संसदीय समितीने स्वीकारली असून, बुधवारी समितीची एक बैठक बोलावण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी ही सूचना केली होती.
तृणमूल काँग्रेसच्या उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, खा. डेरेक ओब्रायन यांच्या सूचनेला अनुषंगून सांसदीय समितीने बुधवारी पर्यटन व नागरी उड्डयन मंत्रालयांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्या, याची माहिती या मंत्रालयाकडून बैठकीत सादर केली जाणार आहे.
तृणमूल काँग्रेसचे पत्र
ओब्रायन यांनी समितीचे चेअरमन टी.जी. वेंकटेश यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, या साथीचा हवाई वाहतूक आणि पर्यटनाला थेट फटका बसत आहे. याची संसदीय समितीने स्वपुढाकाराने गंभीर दखल घेऊन सचिव स्तरावर दोन बैठक बोलावण्यात याव्यात.
coronavirus : पर्यटनावरील परिणामांची संसदीय समितीत चर्चा
कोरोना विषाणूच्या साथीचा पर्यटन व हवाई वाहतूक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांची गंभीर दखल घेण्याची तृणमूल काँग्रेसची सूचना वाहतूक, हवाई व पर्यटनविषयक संसदीय समितीने स्वीकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:40 AM2020-03-18T05:40:09+5:302020-03-18T05:40:48+5:30