मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ९ कोटी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. नोटबंदीमुळे अर्धे व्यवसाय बंद पडले. १०० दिवसांत १.५ टक्के जीडीपी खाली आला होता. आता कोरोनामुळे जीडीपी एक टक्क्याने खाली आला आहे, असे मत बँकिंग तज्ज्ञ आणि कामगार नेते विश्वास उटगी यांनी व्यक्त केले.
सरकार आणि रिझर्व्ह बँक मान्य करते की, अर्थकारण संकटात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी
गर्दी टाळा, घरी राहा, असे सांगण्यात येत आहे. अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. जीडीपी एक टक्क्याने खाली आला
आहे. असंघटित क्षेत्रातील नागरिक व त्यांचे कुटुंबीय इच्छा असूनही कामावर जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना काम मिळत नाही. राज्यातील रोजंदारीवरील कामगार गावी जात आहेत.
बिहार, यूपीकडे जाणाºया रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. नाका कामगार, हातगाडीवाले, बांधकाम कामगार,
हमाल, आदिवासी, वनकामगार,
बेघर कामगार, फॅक्टरी कामगार, कंत्राटी सफाई कामगार यांचा रोजगार बुडत आहे. मनरेगा कामगाराला काम नाही, अशी अवस्था आहे. त्यांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यासाठी सरकारने या कामगारांसाठी आणि श्रमिकांसाठी रेशन व्यवस्थेमार्फत दोन महिन्यांच्या रेशनची मोफत व्यवस्था करायला हवी.
कामगारांना कामावरून कमी न करण्याची मागणी
अनेक उद्योग कामगार कपात करत आहेत. विशेषत: कंत्राटी, हंगामी कामगारांना कामावरून काढले जात आहे. सरकारने एकाही कामगाराला कामावरून कमी करू नये, तसेच जे कामगार कामावर जाऊ शकत नाहीत, त्यांना पगारी रजा देऊन कुणाचेही वेतन कपात करू नये, असेही आदेश दिले पाहिजेत, असे विश्वास उटगी म्हणाले.
कोरोनाच्या धास्तीने ओपीडी फुल्ल
सध्या फोफावत असणाºया कोरोना विषाणूमुळे अक्षरश: मुंबईकरांची झोप उडवली आहे. परिणामी, ताप, सर्दी, खोकला अशा आजारांनी त्रस्त असणारे रुग्ण उपचारासाठी खासगी दवाखाने आणि रुग्णालयांत धाव घेत आहेत.
आरोग्यसेवा देण्यासाठी लाखो डॉक्टर व कर्मचारी, तसेच अल्प मानधनावर काम करणाºया आशा, अंगणवाडी, कर्मचारी व सफाई कामगार प्रचंड कष्ट करीत आहेत. १५-२० वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर, नर्सेस, आशा, अंगणवाडी आणि सफाई कामगारांना कायम करा, अशी मागणी उटगी यांनी केली.
Coronavirus : नऊ कोटी कामगारांचा रोजगार बुडाला, जीडीपी एक टक्क्याने घसरला
Coronavirus: सरकार आणि रिझर्व्ह बँक मान्य करते की, अर्थकारण संकटात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:40 AM2020-03-22T00:40:10+5:302020-03-22T00:45:34+5:30