- सीए - उमेश शर्माअर्जुन : कृष्णा, कोरोना व्हायरस हा सर्व जगभर अशाप्रकारे पसरत आहे की जगातील अर्थव्यवस्थेने गुडघे टेकले आहेत. व्यावसायिकांनी या कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत?कृष्ण : अर्जुना, आपण पाहत आहोत, आपले सरकार आयकर कायदा, जीएसटी कायदा तसेच बँकेच्या काही नियमांमध्ये व्यावसायिकांना तसेच इतर करदात्यास अनेक सवलती देत आहे. जसे, शेवटच्या तारखेमध्ये वाढ करणे, बँकेने कर्जदारांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या सर्व सवलती व्यावसायिकांनाही दिल्या आहेत. तरी त्यांनी सतर्क राहून योग्य ते निर्णय घ्यावेत, जेणेकरून अशा कठीण परिस्थितीत त्यांचा व्यवसाय टिकून राहील. बरेच व्यवसाय लॉकडाउनमध्ये बंद आहेत त्यांनी वर्क फ्रॉम होमचे नियोजन करून त्यानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ चे आर्थिक नियोजन केले पाहिजे.अर्जुन : कृष्णा, व्यावसायिकांनी व्यवसाय टिकवण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत?कृष्ण : अर्जुना, व्यावसायिकांनी सर्वप्रथम मागील वर्षाच्या प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीटशी तुलना करून विश्लेषण केले पाहिजे. तसेच नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट आणि इतर आर्थिक रेशोचे विश्लेषण करून त्याचा संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. तुलनात्मक विश्लेषणानंतर पुढील गोष्टींचा अभ्यास करावा :१) आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोणता खर्च वाढेल? (उदा. माहिती तंत्रज्ञान, कर्मचारी खर्च इत्यादी)२) आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोणते खर्च घटू शकतात? (उदा. व्हेरिएबल कॉस्ट इ.)३) फिक्स कॉस्टची अंमलबजावणी (उदा. भाडेखर्च, व्याज इ.)४) कर्जाचे पुनर्गठन (कर्जासाठी ३-६ महिन्यांची मुदतवाढ, कॅश क्रेडिटमध्ये १०%- २०% ची वाढ)अर्जुन : कृष्णा, आर्थिक संकटाने होणारा परिणाम व्यावसायिकांनी कसा हाताळावा?कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांवर वाईट आर्थिक परिणाम होणार आहेत. व्यावसायिकांनी शक्य असल्यास २०१९-२० वर्षाची बॅलन्सशीट अधिक मजबूत करण्यासाठी ड्रॉइंग पॉवरमध्ये वाढ करावी, जेणेकरून बँकांकडून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कर्ज घेण्यास मदत होईल. व्यावसायिकांनी विक्री वाढवण्यासाठी किमतीमध्ये बदल करावेत. म्हणजेच सूट इत्यादींमध्येही सुधारणा करावी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘वसुली’. कॅश फ्लोचे मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे. सतत ग्राहकांचा फॉलो अप घेऊन वसूली करावी. वसुलीसाठी व्यावसायिकांनी खालील एबीसीचे अॅनॅलिसिस करावे.ए : असे व्यवसाय जे लॉकडाउनमध्ये चालू आहेत.बी : देय क्षमता.सी : नेहमी रडत राहणे (आता बनावट दिवाळखोरी कोण कोण करेल?)अर्जुन : यामधून व्यावसायिकांनी काय बोध घ्यावा ?कृष्ण : असे म्हणतात की, ‘जेव्हा पुढे जाणे कठीण होते तेव्हा कठीणच पुढे जाते.’ जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत पडझड होते तेव्हा प्रत्येक व्यवसायासाठी संकट असते. म्हणूनच या कठीण परिस्थितीत घाबरून न जाता त्यास सामोरे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यापार, उत्पादन किंवा सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाने स्वत:च्या अडचणीचे, परिस्थितीचे विश्लेषण करून त्यानुसार उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्यानुसार कार्य केले पाहिजे.
coronavirus: लॉकडाउनमधील आर्थिक नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:14 AM