नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आॅनलाइन वस्तू पुरविणाऱ्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी भारतातील आपल्या सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.
फ्लिपकार्टने याबाबत जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देश सध्या मोठ्या संकटातून जात आहे. यावेळी आपण सर्वांनी घरी थांबून सुरक्षित राहण्याची गरज असून, देशाला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळेच आम्ही आमची सेवा काही काळासाठी स्थगित करीत आहोत. ग्राहक ही आमची सर्वाेच्च प्राथमिकता असून, आपल्या सेवेसाठी योग्य वेळ येताच आम्ही पुन्हा दाखल होऊ, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
मंगळवारीच अॅमेझॉन कंपनीने जीवनावश्यक वस्तूवगळता आपण अन्य वस्तूंच्या आॅर्डर्स स्वीकारणार नाही असे जाहीर केले होते. मात्र जनतेला जीवनावश्यक वस्तू
पुरविल्या जातील हे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यापाठोपाठ पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर लगेचच फ्लिपकार्टनेही आपली सेवा स्थगित केली आहे.
अनेक आॅनलाइन प्लॅटफॉर्मच्या सेवा बंद
अॅमेझॉन, बिग बास्केट आणि ग्रोफर्स अशा आॅनलाइन प्लॅटफॉर्मवरून किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण स्थानिक अधिकाऱ्यांनी बळजबरीने बंद पाडल्याची तक्रार करण्यात आली आहे. किरणा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा लॉकडाउनमधून वगळण्यात आला आहे मात्र स्थानिक अधिकाºयांनी अनेक ठिकाणी गोडाऊन बंद केली असून, ट्रकही थांबविण्यात आल्याने अनेकांच्या सेवा बंद पडल्या आहेत. येत्या २४ तासात अधिकाºयांशी बोलून त्या पुन्हा सुरू केल्या जातील, असे सांगितले.
Coronavirus : फ्लिपकार्ट, अॅमेझॉनची सेवा स्थगित; लवकरच सेवा सुरू करण्याचा आशावाद
coronavirus :
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:44 AM2020-03-26T01:44:52+5:302020-03-26T01:45:07+5:30