Join us

Coronavirus: रेकॉर्ड ब्रेक उसळीनंतर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:31 PM

अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव आणि कोरोनाच्या संकटामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देगेल्या जवळपास तीन महिन्यांपासून जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे देशभरात टाळेबंदी करण्यात आली आहे. सगळंच ठप्प असल्यानं अर्थव्यवस्थाही पुरती कोलमडली आहे. अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव आणि कोरोनाच्या संकटामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली- गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे देशभरात टाळेबंदी करण्यात आली आहे. सगळंच ठप्प असल्यानं अर्थव्यवस्थाही पुरती कोलमडली आहे. एकीकडे अर्थव्यवस्था संकटात असताना सोन्याला लख्ख झळाळी आल्याचं काल पाहायला मिळालं होतं. परंतु आज सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव आणि कोरोनाच्या संकटामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच सोमवारी सोन्याचे दर वाढले होते. पण मंगळवारी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, MCXवरील सोन्याची किंमत दहा ग्रॅमला प्रति 1000 रुपयांनी घसरून 46 हजार रुपयांवर आली आहे.नवीन सोन्याचे दर (19 मे 2020 रोजी सोन्याचे भाव) - मंगळवारी MCXवरील सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 47,980 रुपयांवरून 46,853 रुपयांवर आले आहेत. सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात - तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जागतिक अर्थव्यवस्था कोरोनामुळे मंदीच्या विळख्यात आहे. त्याच वेळी अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध पुन्हा भडकत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याची खरेदी सुरू केली आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्यातील तेजी वाढू शकते. ते लवकरच 50,000 रुपयांवर जाऊ शकते. सर्वसाधारणपणे शेअर बाजारात अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदारांना सोनं आकर्षित करतं. त्यानुसारच सेन्सेक्स जसजसा खाली येत गेला, तसतसं सोन्याचे दर वधारले होते. काल 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार 929 रुपयांपर्यंत पोहोचली होती. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्यानं 369 रुपयांची उसळी घेतली आणि 47 हजार 750 रुपयांवर मजल मारली. या व्यवहारांदरम्यान सोन्याच्या दरानं 47 हजार 929 या उच्चांकाला स्पर्श केला होता. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' संकटांनं केलं भीषण स्वरूप धारण, मोदी अन् शहांनी घेतला परिस्थितीचा आढावा

धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट; मोदींनी बोलावली तात्काळ बैठक

CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

टॅग्स :सोनंकोरोना वायरस बातम्या