नवी दिल्ली - जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यापासून कोरोनाच्या फैलावाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे तसेच खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने अर्थचक्र हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळाच ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन सरकारने आयटी आणि बीपीओ कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होमची मुदत वाढवली आहे. या कंपन्यांसाठीचे वर्क फ्रॉम होमसाठीचे आदेश सरकारने अजून पाच महिन्यांसाठी वाढवले आहेत. त्यामुळे आता ३१ डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करण्याची सवलत मिळणार आहे. यासंबंधीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सरकारने वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करण्याची परवानगी विविध कंपन्यांना दिली होती. त्यानंतर वर्क फ्रॉम होमसाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान, ही मुदत आता संपत असल्याने सरकारकडून वर्क फ्रॉम होमला अजून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता वर्क फ्रॉम होमसाठीचे नियम आणि अटी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी