Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus : खातेदारांच्या वाढत्या गर्दीमुळे बँक कर्मचारीही धास्तावले

Coronavirus : खातेदारांच्या वाढत्या गर्दीमुळे बँक कर्मचारीही धास्तावले

coronvirus : बँकांमध्ये खातेदारांची इतकी गर्दी होत आहे की, त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूपच भीती वाटू लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:10 AM2020-03-24T00:10:49+5:302020-03-24T00:11:20+5:30

coronvirus : बँकांमध्ये खातेदारांची इतकी गर्दी होत आहे की, त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूपच भीती वाटू लागली आहे.

Coronavirus: A growing crowd of accountants scared bank employees | Coronavirus : खातेदारांच्या वाढत्या गर्दीमुळे बँक कर्मचारीही धास्तावले

Coronavirus : खातेदारांच्या वाढत्या गर्दीमुळे बँक कर्मचारीही धास्तावले

मुंबई/नवी दिल्ली : कोरोगा विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने बँक कर्मचारी धास्तावले असून, बँकांच्या विविध शाखांत होणारी गर्दी टाळण्यासाठी बँकांनी उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बँकांच्या कामकाजावर नियंत्रण आणण्याचा विचार सुरू आहे.
रेल्वे, बस आदी सेवा ज्याप्रमाणे बंद करण्यात आल्या आहेत, तसाच निर्णय बँकांबाबतही घेण्यात यावा, अशी मागणी नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्सचे उपाध्यक्ष अश्वनी राणा यांनी केली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून खातेदारांनी बँकांमध्ये खूप गर्दी सुरू केली आहे. ती गर्दी कमी व्हायला हवी.
बँकांमध्ये खातेदारांची इतकी गर्दी होत आहे की, त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूपच भीती वाटू लागली आहे. तिथे येणाºया खातेदारांपैकी एखाद्याला जरी संसर्ग झाला असेल तर आम्ही त्याच्या कचाट्यात सापडू, असे कर्मचारी म्हणत आहेत.
ज्यांना आॅनलाइन आर्थिक व्यवहार करता येतात, त्यांनी बँकेत येण्याची गरज नाही. ज्येष्ठ नागरिकांना मात्र बँकांच्या शाखेत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ठरावीक लोकांनाच प्रवेश दिल्यास कर्मचारी
व खातेदारांना कोरोनाच्या
संसर्गापासून सुरक्षित राहता येईल, असे ते म्हणाले.

कामात व वेळेत बदल
नव्या चेकबुकसाठी अर्ज, पासबुक अपडेट करणे ही सध्या तातडीची गरज असू शकत नाही. त्यासाठी त्यांनी शाखेत येण्याची गरज नाही. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक, इंडसइंड या बँकांनी आपल्या कामाच्या वेळा सकाळी १0 ते दुपारी २ पर्यंत केल्या आहेत.

Web Title: Coronavirus: A growing crowd of accountants scared bank employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.