Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus : पर्यटनाअभावी हॉटेल व्यवसायाला ४५ हजार कोटींचा फटका बसणार

Coronavirus : पर्यटनाअभावी हॉटेल व्यवसायाला ४५ हजार कोटींचा फटका बसणार

अन्य राज्यांतून, तसेच देशांतून पर्यटक व व्यवसायाच्या निमित्ताने लोकांचे येणे-जाणे पूर्णत: बंद झाले आहे. त्याचा हॉटेल व्यवसायावर आताच प्रचंड परिणाम झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 04:46 AM2020-03-21T04:46:51+5:302020-03-21T04:47:26+5:30

अन्य राज्यांतून, तसेच देशांतून पर्यटक व व्यवसायाच्या निमित्ताने लोकांचे येणे-जाणे पूर्णत: बंद झाले आहे. त्याचा हॉटेल व्यवसायावर आताच प्रचंड परिणाम झाला आहे.

Coronavirus: Hotel business will suffer Rs 45 thousand Crore Rupees | Coronavirus : पर्यटनाअभावी हॉटेल व्यवसायाला ४५ हजार कोटींचा फटका बसणार

Coronavirus : पर्यटनाअभावी हॉटेल व्यवसायाला ४५ हजार कोटींचा फटका बसणार

मुंबई/नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पर्यटन व व्यावसायिक प्रवास यांत प्रचंड घट झाली आहे. निर्बंधांमुळे देशातील हॉटेल व्यवसायाला या वर्षी सुमारे ४५ हजार कोटींचा फटका बसणार आहे. बड्या हॉटेलांना व त्यांच्या साखळीवर सवाधिक विपरित परिणाम होईल, असे दिसत आहे.

सर्वच हॉटेलांमधील बार, पब्ज, स्पा, जिम, स्विमिंग पूल यांच्यावर बंदी घालली आहे. खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगण्यात आले आहे, तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना भारतासह कोणत्याच देशात न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर ही मोठी शहरे ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.

त्यामुळे अन्य राज्यांतून, तसेच देशांतून पर्यटक व व्यवसायाच्या निमित्ताने लोकांचे येणे-जाणे पूर्णत: बंद झाले आहे. त्याचा हॉटेल व्यवसायावर आताच प्रचंड परिणाम झाला आहे. त्यामुळे या वर्षभरात हॉटल व्यवसायाला ४५ हजार कोटी रुपयांचा फटका बसेल, असा अंदाज आहे. बड्या हॉटेलांच्या व्यवसायावर १५ हजार कोटींचा परिणाम होईल, असे दिसत आहे.

ओला, उबर, टॅक्सीवरही परिणाम

अनेक निर्बंधांमुळे चार दिवसांपासून ओला, उबर व साध्या टॅक्सीवाल्यांच्या धंद्यात ५0 ते ६0 टक्के घट झाली आहे. ३१ मार्चपर्यंत शहरेही बंद केली, तर यांना १0 टक्के तरी धंदा मिळेल का, हा प्रश्न आहे.
 

Web Title: Coronavirus: Hotel business will suffer Rs 45 thousand Crore Rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.