नवी दिल्लीः कोरोनाच्या प्रादुर्भावानं देशाला संकटात टाकलं असून, प्रत्येक जण आपापला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारही कोरोनाशी लढण्यासाठी पूर्ण मदत करत आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे कोरोनावर मोफत उपचार करता येऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. खरं तर भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही आरोग्य विमा योजना आहे. ज्याअंतर्गत गरिबांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतो. या योजनेंतर्गत लाभार्थी सार्वजनिक आणि खासगी दोन्ही रुग्णालयांत मोफत उपचाराची सुविधा मिळवू शकतो. पॅकेज दराच्या आधारे उपचारांचे बिल दिले जाईल.
या योजनेंतर्गत गर्भधारणेची काळजी आणि माता आरोग्य सेवा, नवजात आणि बाल आरोग्य सेवा, बाल आरोग्य, जुना संसर्गजन्य रोग, मानसिक आजार व्यवस्थापन, दंत काळजी, वृद्धांसाठी आवश्यक औषध यांसारख्या आरोग्य सेवांचा समावेश आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य विम्याचा लाभ घेणा-यांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 3.7 कोटी लाभार्थ्यांना योजनेंतर्गत ई-कार्ड देण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत 15400 रुग्णालयं जोडली गेली
सरकारने या योजनेशी सुमारे 15,400 रुग्णालये देखील जोडलेली आहेत. त्यातील 50 टक्के खासगी रुग्णालये आहेत. त्याचबरोबर 'आयुष्मान भारत' योजना खासगी रुग्णालये आणि विमा कंपन्यांसाठी जीवनवाहिनी बनली आहे. अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनीही आयुष्मान भारत योजनेचे कौतुक केले आहे. आयुष्मान भारत योजनेत मोदी सरकार महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक प्राधान्य देत आहे. आयुष्मान भारत योजनेतील सर्वात मोठ्या वैशिष्ट्यामध्ये कौटुंबिक आकार आणि वय समाविष्ट करण्याचे कोणतेही बंधन नाही. आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांचे कॅशलेस व पेपरलेस उपचार सरकारी रुग्णालये व शहरी रुग्णालयांमध्ये केले जातील.
Coronavirus : कोरोनावर सरकारच्या 'या' योजनेतून मिळतोय मोफत उपचार; जाणून घ्या कसा मिळवाल फायदा
या योजनेंतर्गत लाभार्थी सार्वजनिक आणि खासगी दोन्ही रुग्णालयांत मोफत उपचाराची सुविधा मिळवू शकतो. पॅकेज दराच्या आधारे उपचारांचे बिल दिले जाईल.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 08:37 AM2020-04-14T08:37:04+5:302020-04-14T08:37:36+5:30