Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus : लॉकडाऊननंतर विमान प्रवास तिप्पट महागणार?; सामान्यांचं स्वप्न 'हवेत'च विरणार

Coronavirus : लॉकडाऊननंतर विमान प्रवास तिप्पट महागणार?; सामान्यांचं स्वप्न 'हवेत'च विरणार

लॉकडाऊननंतर मध्यमवर्गासाठी विमानाने प्रवास करणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. विमानांच्या तिकिटांमध्ये भरमसाट वाढ होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:16 PM2020-04-13T13:16:14+5:302020-04-13T13:19:10+5:30

लॉकडाऊननंतर मध्यमवर्गासाठी विमानाने प्रवास करणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. विमानांच्या तिकिटांमध्ये भरमसाट वाढ होऊ शकते.

Coronavirus : impact after lockdown airfare may be increased upto three times vrd | Coronavirus : लॉकडाऊननंतर विमान प्रवास तिप्पट महागणार?; सामान्यांचं स्वप्न 'हवेत'च विरणार

Coronavirus : लॉकडाऊननंतर विमान प्रवास तिप्पट महागणार?; सामान्यांचं स्वप्न 'हवेत'च विरणार

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वच उद्योगधंदे बंद असून, लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर पुढे काय?, हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे. लॉकडाऊननंतर जनतेला महागाईचा सामना करावा लागू शकतो. लॉकडाऊननंतर मध्यमवर्गासाठी विमानाने प्रवास करणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. विमानांच्या तिकिटांमध्ये भरमसाट वाढ होऊ शकते. सामाजिक अंतर(सोशल डिस्टन्सिंग)चा विचार करता विमान कंपन्या आसन व्यवस्थेत तसा बदल करणार आहेत, ज्यामुळे आपल्याला हवाई प्रवासासाठी तिप्पट पैसे मोजावे लागू शकतात. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, विमान कंपन्या या पर्यायावर विचार करीत आहेत. सामाजिक अंतर लक्षात घेऊन केवळ एक प्रवासी हा तीन प्रवाशांच्या पंक्तीत बसून, दुसरा प्रवासी त्याच्या मागच्या सीटवर बसणार आहे.

हवाई प्रवास तीनपट महागणार 
180 प्रवाशांची व्यवस्था असलेल्या जागांवर फक्त ६० प्रवासी बसतील, असा बदल केला जाऊ शकतो. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विमान कंपन्या दीड ते तीनपट जास्त भाडे आकारू शकतात. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, "कालांतराने कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतर सामाजिक अंतरांचे नियम शिथिल करण्यात येतील."

विमान पुनर्उड्डाणाची योजना तयार
नागरी उड्डयन संचालनालय (डीजीसीए) विमान पुनर्उड्डाणाची योजना तयार केली आहे. लॉकडाऊननंतर सरकार कामं नियमितपणे सुरू करणार असून, त्यावेळी ही योजना लागू केली जाऊ शकते. लॉकडाऊननंतर सुरुवातीच्या आठवड्यात विमान प्रवासाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे दिल्ली, मुंबई, हैदराबाद व अन्य विमानतळांवर दीड मीटर अंतर राखण्यात कोणतीही अडचण येणार नाही. भारतीय विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळत आहे. इंडिगो व्यतिरिक्त इतर कोणत्याही एअरलाईन्समध्ये रोख राखीव पैसा जास्त नाही.
 

Web Title: Coronavirus : impact after lockdown airfare may be increased upto three times vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.