Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कोरोनाच्या लढ्यात Ola ने उचललं मोठं पाऊल; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कोरोनाच्या लढ्यात Ola ने उचललं मोठं पाऊल; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators

Ola Announces Doorstep Delivery Of Free Oxygen Concentrators : ओला फाऊंडेशनने गिव्ह इंडियासह भागीदारी करत मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स देण्याचं सांगितलं आहे. हे सर्व ओला मोबाईल अ‍ॅपद्वारे शक्य होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 03:36 PM2021-05-11T15:36:44+5:302021-05-11T16:27:22+5:30

Ola Announces Doorstep Delivery Of Free Oxygen Concentrators : ओला फाऊंडेशनने गिव्ह इंडियासह भागीदारी करत मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स देण्याचं सांगितलं आहे. हे सर्व ओला मोबाईल अ‍ॅपद्वारे शक्य होईल.

CoronaVirus Live Updates Ola announces doorstep delivery of free oxygen concentrators | CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कोरोनाच्या लढ्यात Ola ने उचललं मोठं पाऊल; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कोरोनाच्या लढ्यात Ola ने उचललं मोठं पाऊल; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators

नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. याच दरम्यान आता ऑनलाईन कॅब (Online Cab) सर्व्हिस देणारी कंपनी ओलाने (Ola) मोठं पाऊल उचललं आहे. Ola ने गरजूंना मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स (oxygen concentrators) देण्याची घोषणा केली आहे. 

कंपनी ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवेल, त्यासाठीही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ओला अ‍ॅपवर काही बेसिक डिटेल्स देऊन, घरी मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स मागवता येऊ शकतात. एकदा डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर ओला तुमच्या घरापर्यंत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स पोहोचवणार आहे. ओला फाऊंडेशनने गिव्ह इंडियासह भागीदारी करत मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स देण्याचं सांगितलं आहे. हे सर्व ओला मोबाईल अ‍ॅपद्वारे शक्य होईल. ओला यासाठी युजर्सकडून कंन्सट्रेटर्ससाठी कोणतेही पैसे घेणार नाही. कंपनी दिलेला ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स त्याची गरज संपल्यानंतर पुन्हा घेऊन जाणार आहे. 

कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा देखील खर्च करणार

या सर्व्हिसची सुरुवात पुढील आठवड्यापासून बंगळूरू येथून होणार आहे. त्यानंतर ही सुविधा इतर शहरांमध्ये सुरू होणार आहे. सध्या बंगळुरूमध्ये 500 ऑक्सिजन कंन्सट्रेटर्ससह ही सर्व्हिस सुरू करण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या काही काळात कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा देखील खर्च करणार आहे. ओलाचे को-फाऊंडर भाविश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सर्वांना या कोरोना महामारीविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. आज आम्ही O2forIndia साठी गिव्ह इंडियासह भागीदारी करत आहोत. याच्या मदतीने आम्ही गरजूंना मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स पोहोचवण्यासाठी मदत करत आहोत."

कंन्सट्रेटर्स आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणताही चार्ज लागणार नाही

"ओला अ‍ॅप युजर्स कंन्सट्रेटर्सची रिक्वेस्ट ओला अ‍ॅपमध्ये टाकू शकतात. एकदा रिक्वेस्ट व्हेरिफाय झाल्यानंतर ओला युजर्सच्या दरवाजापर्यंत कंन्सट्रेटर्स पोहोचेल आणि गरज संपल्यानंतर तो परतही आणला जाईल. कंन्सट्रेटर्स आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणताही चार्ज लागणार नाही" असं देखील अग्रवाल यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी उबरने वॅक्सिनेशन ड्राईव्हला प्रोत्साहन देण्यासाठी, लस घेण्यासाठी वॅक्सिनेशन सेंटरवर जाणाऱ्या लोकांना फ्री राईडची घोषणा केली आहे. या सर्व्हिस अंतर्गत लोकांना 300 रुपयांपर्यंतच्या राईडसाठी कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates Ola announces doorstep delivery of free oxygen concentrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.