Join us

coronavirus: नियम शिथिल तरीही कामावर परतण्यास अनेकजण अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:19 AM

गुगल’ने ४ ते ७ मे या काळातील उपलब्ध डेटाचे विश्लेषण केल्यानंतर ही बाब समोर आली. यात कामाची ठिकाणे, रिटेल, उद्यान, दळणवळण साधने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांचा विचार करण्यात आला.

नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत तिसºया टप्प्यामध्ये कारखाने आणि इतर ठिकाणी काम सुरू होण्याची व्याप्ती वाढली असली तरी ती समाधानकारक नाही. नियम शिथिल केल्यानंतरही लोक कामावर परतण्यास फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे.‘गुगल’ने ४ ते ७ मे या काळातील उपलब्ध डेटाचे विश्लेषण केल्यानंतर ही बाब समोर आली. यात कामाची ठिकाणे, रिटेल, उद्यान, दळणवळण साधने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांचा विचार करण्यात आला. ‘गुगल’च्या ‘कम्युनिटी मोबिलिटी रिपोर्ट्स’अंतर्गत (सीएमआर) कोविडचा फटका बसलेल्या महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू या ६ राज्यांचे विश्लेषण करण्यात आले. यात कर्मचाऱ्यांचा लोकेशन डेटा वापरण्यात आला. सीएमआरनुसार, लॉकडाऊनच्या तिसºया टप्प्यातील ४ ते ७ मे या प्रारंभीच्या काळात कामावर येणाºया कर्मचाºयांची संख्या वाढत आहे. दुसºया टप्प्याच्या तुलनेत हे प्रमाण ८ टक्क्यांनी वधारले. मात्र, लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच्या स्थितीशी तुलना करता ते अर्ध्यापेक्षाही कमी भरते. २० एप्रिल ते ३ मे या लॉकडाऊनच्या दुसºया टप्प्यात कामाच्या ठिकाणांसदर्भातील नियम काहीसे शिथिल करण्यात आले होते. तरीही कामावर न परतता घरीच थांबण्याला लोकांची पसंती होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याव्यवसाय