Join us

Coronavirus : कच्च्या तेलानं बिघडवलं गणित; सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 3:13 PM

सोमवारी अमेरिकेच्या वायदा बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल शून्य डॉलरच्या खाली गेल्या होत्या.

ठळक मुद्दे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजार पुरता कोलडमला आहे. मंगळवारी निर्देशांक 1237 अंकांनी घसरून 30,410 च्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्ये 350.75 घसरण झाली असून, तोसुद्धा 8911च्या पातळीवर आला.

नवी दिल्लीः जागतिक बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजार पुरता कोलडमला आहे. मंगळवारी निर्देशांक 1237 अंकांनी घसरून 30,410 च्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्ये 350.75 घसरण झाली असून, तोसुद्धा 8911च्या पातळीवर आला. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी अमेरिकेच्या वायदा बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल शून्य डॉलरच्या खाली गेल्या होत्या. इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा क्रूड तेलाची किंमत एवढ्या नीचांकी पातळीवर गेली.4 लाख कोटी गुंतवणूकदार बुडालेबाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले. सोमवारी मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध एकूण कंपन्यांचं भाग भांडवल 1,23,72,581.25 कोटी रुपये होते, जे आज 3,97,028 कोटी रुपयांनी घसरून 1,19,75,553.68 कोटी रुपयांवर आलं आहे. या बाजारातील घसरणीमुळे मिड आणि स्मॉल कॅप समभागांची जोरदार विक्रीही झाल्याचं दिसून आलं. बीएसईचा मिड कॅप निर्देशांक 3 टक्क्यांच्या आसपास आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 3.11 टक्क्यांनी घसरून व्यापार करत होता.क्रूड तेलाची किंमत शून्य डॉलरपर्यंत खाली सोमवारी पहिल्यांदा यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे दर शून्याच्या खाली गेले होते. अशा परिस्थितीत सोमवारी बाजारात कच्च्या तेलाची किंमत शून्य म्हणजेच -37.63 डॉलर/ बॅरलच्या खाली गेली होती. आता स्वस्त क्रूडचा फायदा भारताला होणार आहे. तेल कंपन्यांना मजबूत करण्यासाठी सरकारची योजना आहे. भारत सरकार आपला धोरणात्मक तेल राखीव कोटासुद्धा भक्कम करणार असून, त्यामुळे धोरणात्मक तेल राखीव साठ्याची क्षमताही वाढणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या बाहेरील लोकांवर तात्पुरती बंदी लादण्यात आली आहे. दुसरीकडे हाँगकाँगमधील लॉकडाऊनला 14 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही

Coronavirus : मुस्लिमांसाठी भारत स्वर्ग, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित; मोदी कॅबिनेटमधील मंत्र्यांचं विधान

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानिर्देशांक