Join us

CoronaVirus News: छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSMEsसाठी सरकारकडून 20000 कोटींच्या पॅकेजची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 5:57 PM

CoronaVirus News : नागरी गृहनिर्माण मंत्रालयानं विशेष सूक्ष्म-कर्ज योजना सुरू केली असून, याद्वारे छोटी दुकाने किंवा पथ विक्रेते कर्ज घेऊ शकणार आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 1 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत फुटपाथवरचे दुकानदार अन् विक्रेत्यांसाठी मोठी कर्ज योजना मोदी सरकारनं जाहीर केली आहे. नागरी गृहनिर्माण मंत्रालयानं विशेष सूक्ष्म-कर्ज योजना सुरू केली असून, याद्वारे छोटी दुकाने किंवा पथ विक्रेते कर्ज घेऊ शकणार आहेत. ही योजना बराच काळ टिकेल. याचा फायदा 50 लाखांहून अधिक दुकानदारांना होणार आहे.एमएसएमईबाबतचे हे ऐतिहासिक निर्णय>>लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग समूहा( एमएसएमई)सह रस्त्यावर काम करणा-यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात 60 दशलक्षांहून अधिक एमएसएमई आहेत. कोरोना व्हायरस साथीच्या नंतर पंतप्रधान मोदींनी या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन एमएसएमईला पॅकेजही दिलं आहे. >>आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत रोडमॅप प्रसिद्ध करण्यात आला आहे. एमएसएमईची व्याख्या बदलली आहे. अडचणीत अडकलेल्या एमएसएमई कंपन्यांना २० हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर झाले आहे. कदाचित अशा एमएसएमई कंपन्यांची सरकारकडे यादी असेल.>> प्रकाश जावडेकर म्हणाले की, एमएसएमईसाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली गेली आहे. असे प्रथमच घडले आहे. या योजनेद्वारे कंपन्या बाजारातून पैसे गोळा करू शकतात.फुटपाथ विक्रेत्यांसाठी सरकारची जनजागृती जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार जनजागृती कार्यक्रम राबवेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे कर्ज कसे मिळेल, ते कोठे मिळणार आणि कोणत्या परिस्थिती असतील, याविषयी फुटपाथ विक्रेत्यांना व फुटपाथवरच्या दुकानदारांना माहिती दिली जाईल.मोबाइल अॅप लवकरच सुरू होईलजनजागृतीसाठी शासनाने मोबाइल अॅप व पोर्टलही तयार केले आहे. यातूनही पथ विक्रेते व  दुकानदारांना या योजनेची माहिती मिळू शकेल. ही योजना दीर्घकाळ चालविली जाईल.

हेही वाचा

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

परदेशी वस्तूंना आता बाय बाय; भारतात पॅरामिलिट्री कँटीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी उत्पादनं

लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर

धक्कादायक... वडिलांनीच पोटच्या तीन लहान मुलींना नदीत फेकून दिलं

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या