मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे बऱ्याच भागात लॉकडाउन होत असल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण अनुभवली. बाजार सुरू होताच पहिल्याच तासात निर्देशांक दहा टक्क्यांहून अधिक खाली गेल्याने लोअर सर्किट लागून व्यवहार पाऊणतास बंद राहिले. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स ४००० अंशानी, तर निफ्टी ११३५ अंशांनी खाली आले. यामुळे गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल वाहून गेले.कोरोनमुळे औद्योगिक उत्पादन मंदावणार आहे त्यामुळे पहिल्याच तासात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दहा टक्क्यांहून अधिक खाली आले. निर्देशांक दिवसअखेरीस १३.१५ टक्के म्हणजेच ३९३५ ने येऊन २५,९८१.२४ वर बंद झाला.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (निफ्टी) ११३५.२० अंशानी (१२.९८ टक्के) घसरून ७,६१०.२५ अंशावर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप या क्षेत्रीय निर्देशांकासह बाजाराचे सर्वच निर्देशांक लाल रंगात बंद झालेले दिसले.भांडवल मूल्यात मोठी घटशेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजार भांडवल मूल्यामध्ये मोठी घट झाली. सोमवारच्या दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे दहा हजार कोटी रुपये भांडवल वाहून गेले. मुंबई शेअर बाजाराच्या १९ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. बाजारातील २०३७ कंपन्या या भाव खाली आलेल्या स्थितीत बंद झाल्या, तर २३२ समभाग वाढीव पातळीवर बंद झाले. सुमारे ९२५ आस्थापनांच्या समभागांनी वर्षभरातील नीच्चांकी किंमत गाठली आहे.
Coronavirus : मुंबई शेअर बाजाराची सर्वात मोठी गटांगळी; १० लाख कोटी बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 2:01 AM