नवी दिल्ली : कोरोना महामारीचा पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या दोन लाटांमुळे पुरते कोसळलेले पर्यटन क्षेत्र नव्याने उभारी घेत असतानाच तिसरी लाट आली. याचा मोठा बसल्याने पर्यटन क्षेत्राच्या उत्पन्नात ७२ टक्के घट झाली असून, हे क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी २०२४ उजाडेल, अशी शक्यता जागतिक पर्यटन संघटनेने व्यक्त केली आहे.
कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉन अधिक घातक नसला तरीही त्याच्या प्रसाराच्या वेगामुळे पर्यटन क्षेत्राला जम बसविण्यात अडचणी येत आहेत. अहवालानुसार, पर्यटन क्षेत्रात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २०२० मध्ये पर्यटन क्षेत्राच्या उत्पन्नात २०१९ च्या तुलनेत ७२ टक्के घट झाली आहे.
२०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा बसला होता. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत अनुक्रमे १९ आणि १७ टक्के वाढ झाली आहे. तथापि, २०२१ मध्ये मध्य पूर्वेतील पर्यटकांचे येणे २४ टक्के कमी झाले, तर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील पर्यटकांमध्ये ६५ टक्के घट आहे. कोराेनाचा सर्वात पहिला फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे.
पर्यटन क्षेत्राचे योगदान
२०२१ : १.९ ट्रिलियन डॉलर
२०२० : १.६ ट्रिलियन डॉलर
२०१९ : ३.५ ट्रिलियन डॉलर
CoronaVirus News: पर्यटन क्षेत्राला कोरोना ग्रहण; उत्पन्नात ७२ टक्के घट
परिस्थिती पूर्वपदावर येण्यास २०२४ उजाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:42 AM2022-01-21T05:42:31+5:302022-01-21T05:42:50+5:30