Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus News: उबेर करणार २० टक्के कर्मचारी कपात

CoronaVirus News: उबेर करणार २० टक्के कर्मचारी कपात

आर्थिक चणचण वाढल्याने उबेर या कंपनीने जगभरातील आपल्या २० टक्के कर्मचाऱ्यांना तात्पुरती सुटी (ले ऑफ) देण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:51 AM2020-05-02T02:51:23+5:302020-05-02T02:51:39+5:30

आर्थिक चणचण वाढल्याने उबेर या कंपनीने जगभरातील आपल्या २० टक्के कर्मचाऱ्यांना तात्पुरती सुटी (ले ऑफ) देण्याचा निर्णय घेतला आहे.

CoronaVirus News: Uber to cut staff by 20% | CoronaVirus News: उबेर करणार २० टक्के कर्मचारी कपात

CoronaVirus News: उबेर करणार २० टक्के कर्मचारी कपात

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पर्यटन आणि वाहतूक उद्योगाला मोठा फटका बसला आहे. यामुळे आर्थिक चणचण वाढल्याने उबेर या कंपनीने जगभरातील आपल्या २० टक्के कर्मचाऱ्यांना तात्पुरती सुटी (ले ऑफ) देण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरामध्ये उबेरचे २७००० कर्मचारी असून त्यापैकी ५४०० जणांवर कपातीची कुºहाड कोसळणार आहे.
लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या उबेरने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्याचेही जाहीर केले आहे. ही कपात १० ते ३० टक्के होणार असून ती १२ आठवड्यांपर्यंत लागू राहील. उबेरचे मुख्य तांत्रिक अधिकारी थुआन फाम यांनी याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांची काम उबेरच्या इंजिनिअरिंग टीमकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय आगामी काळात इंजिनिअरिंग टीमच्या ३८०० कर्मचाºयांपैकी ८०० कर्मचाºयांची कपात करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. उबेरने मागील वर्षाही आपल्या ११०० कर्मचाºयांना कामवरून कमी केले होते, हे विशेष.

Web Title: CoronaVirus News: Uber to cut staff by 20%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Uberउबर