नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत फेसमास्क आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. लोकांनी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केल्याने मास्कचे महत्व अधिकच वाढले आहे. हे लक्षात घेत युनिमास्कने एक अँटिव्हायरल मास्क बाजारात आणले आहे. हे ममास्क 100 टक्के कॉटनचे असून ते स्किन-फ्रेंडली, टिकाऊ आणि पर्यावरणाला अनुकूल असे आहे.
हे मास्क फॅब्रिकवर अंटी-व्हायरल ट्रिटमेंटसह, 100 टक्के उच्च गुणवत्ता असलेल्या कॉटन फॅब्रिकचा वापर करून तयार करण्यात आले आहे.
हे मास्क, सार्स-कोव 2, एच1 एन1, बॅक्टेरिया आणि इतर धोकादायक व्हायरस फॅब्रिकच्या संपर्कात आल्यानंतर काही सेकंदातच नष्ट करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन हेल्थगार्ड टेक्नोलॉजीचा वापर करून तयार केले आहे. हे तंत्रज्ञान फॅब्रिकच्या संपर्कात आलेल्या व्हायरसला 99.94 टक्क्यांपर्यंत नष्ट करू करते.
किंमत 495 रुपये - हे मास्क प्रत्येकापर्यंत सहज पोहचावे या हेतूने याची किंमत 495 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. हे मास्क पाढऱ्या रंगात, वाईन रेड रंगात आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. आरामदायक ईअर लूप फास्टेनर्स, फ्लेग्झिबलनोज ब्रिज आणि आरामदायक चीन इलास्टिक, हे या मास्कचे वैशिष्ट्य आहे. हे मास्क ऑनलाईन मार्केटप्लेस आणि www.unimask.in वरही उपल्बध आहे.
यासंदर्भात बोलताना युनिमास्कचे सीईओ कपिल भाटिया म्हणाले, 'आम्ही अशा मास्कच्या नव्या रेंजसह, आपल्या ग्राहकांच्या चांगल्या आरोग्यासाठी योगदान करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. जे पर्यावरणाला लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. हे मास्क मजबूत कॉटन फॅब्रिकने तयार करण्यात आले आहे. तसेच यात इतर समान मास्कप्रमाणे नुकसान पोहचवेल, असे कम्पोनंट वापरण्यात आलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या नव्या हेल्थगार्ड टेक्नोलॉजीने तयार केलेले हे मास्क सार्स-कोव-2 व्हायरससाठी सुरक्षित आहेत.'
महत्त्वाच्या बातम्या -
कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा
CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात
ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!