Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus News  : २० लाख कोटींच्या पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

CoronaVirus News  : २० लाख कोटींच्या पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 01:50 AM2020-05-21T01:50:51+5:302020-05-21T01:51:37+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली.

CoronaVirus News: Union Cabinet approves Rs 20 lakh crore package | CoronaVirus News  : २० लाख कोटींच्या पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

CoronaVirus News  : २० लाख कोटींच्या पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेची झालेली हानी भरून काढण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील विविध योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील विविध योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या या योजनांमध्ये एमएसएमईसाठी ३ लाख कोटी, एनबीएफसी आणि गृहवित्त कंपन्यांसाठीची विशेष रोखता योजना, प्रधानमंत्री मत्यसंपदा योजना, १० हजार कोटी रुपयांची अन्नप्रक्रिया उद्योगांसाठीची योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजनेला मुदतवाढ, स्थलांतरित मजुरांसाठी मोफत धान्य देण्याबाबतची आत्मनिर्भर भारत योजना आदींचा समावेश आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीर नागरी सेवा भरतीबाबतचा अध्यादेश तसेच कोळसा व अन्य खाणींच्या लिलावाबाबतची नवीन
योजना यांनाही मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: CoronaVirus News: Union Cabinet approves Rs 20 lakh crore package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.